Raigad Viral Video: रायगडाचे रौद्र रूप दर्शविणारा नवीन व्हिडिओ व्हायरल..!! गड किल्ल्यावर जाताना काळजी घ्या

Raigad Viral Video: नमस्कार मित्रांनो रायगडावरील तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यामधील अनेक व्हिडिओ हे खूपच सुंदर असतील तर काही व्हिडिओ हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असतील. त्याचबरोबर अनेक व्हिडिओ हे वरून दाखवण्यात येणाऱ्या उंचीचे देखील असतील. परंतु चक्क रायगड या किल्ल्याला आज धरणाचे स्वरूप आल्याचा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिलेला नसेल.

मात्र आत्ताच काही दिवसांपूर्वी रायगड या किल्ल्यावर ढगफुटी झाली आहे. आणि या कारणामुळे रायगडाच्या पायऱ्यावर तसेच रायगडाच्या भिंतीवरून मोठ्या प्रमाणात पाणी पडताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हे व्हिडिओ इतके भयानक आहेत की, तुम्ही गडावर फिरायला जायच्या अगोदरच जाऊ की नको असा विचार कराल… परंतु अनेकांना हे दृश्य जवळून पाहायला किती मजा आली असती असा देखील मनात विचार येईल…Raigad Viral Video

परंतु, रायगड किल्ल्यावर ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. आणि या कारणामुळे किल्ल्यावरून मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या वेगाने पाणी खालच्या दिशेने वाहत होते. पाण्याचा वेग इतका जास्त होता की पाण्यासोबत एखादा व्यक्ती सहज वाहून जाऊ शकत होता. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की मोठ्या एकजुटीने जीव मुठीत घेऊन लोक या ठिकाणी उभे राहिलेले आहेत.

परंतु याच दरम्यान एक व्यक्ती पायऱ्यावर अडकल्याचे देखील आपल्याला दिसत आहे. आणि त्यानंतर त्या व्यक्तीला आजूबाजूची व्यक्ती धरून पायरीच्या बाजूला काढतात. आणि तो व्यक्ती सुखरूप बाजूला येऊन बसतो.त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ खालील प्रमाणे पाहू शकता….Raigad Viral Video

 

Leave a Comment