Majhi Ladki Bahin Yojana: संपूर्ण राज्यातील सर्व महिलांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार आता माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एक हजार पाचशे रुपये देणार आहे. त्याचबरोबर या योजनेची घोषणा ही जून महिन्यात केली होती. आणि या योजनेची अंमलबजावणी ही जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे. त्याचबरोबर या योजनेचा अर्ज कोठे करायचा आहे? या योजनेसाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात? संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्यातील शिंदे सरकारने राज्यातील सर्व गरीब महिलांना माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये आर्थिक मदत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आणि या योजनेचा शासन निर्णय हा 28 जून 2024 रोजी सरकारने काढला होता. गोरगरीब महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.
त्याचबरोबर या योजनेचा अर्ज करताना महिलांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून राज्य सरकारने स्वतंत्र ॲप तयार केले आहे. आणि या ॲपवर जाऊन महिला अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकत आहेत. त्याचबरोबर ज्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येत नाही. त्या महिलांकरिता जवळच्या शेतीमध्ये देखील अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. त्याचबरोबर या महिला अंगणवाडी सेविकाकडे देखील या योजनेचा अर्ज करू शकतात. हा अर्ज करण्यासाठी कोणताही व्यक्ती फीस आकारणार नाही याची दक्षता घ्या. अशी देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे.Majhi Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज हा नारीशक्ती दूत या ॲपवर करता येणार आहे. आणि या ॲपवर महिलांना त्यांची कागदपत्रे देखील अपलोड करता येणार आहेत. यामुळे महिलांना अर्ज करण्यासाठी कोणतेही फीस लागणार नाही.
या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील?
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- अर्जदार महिलेचे वय 21 वर्षे ते 65 वर्ष एवढे असावे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- त्याचबरोबर या योजनेची अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही खालील शासन निर्णय देखील पाहू शकता.
- शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा एक फोटो
- बँक खाते पासबुक(आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक)
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (पुढील कागदपत्र पंधरा वर्षे जुने असावे, रेशन कार्ड/ जन्म दाखला/मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचा दाखला).Majhi Ladki Bahin Yojana