Hawamaan Andaaz Today: राज्यभरात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार..!! लगेच पहा संपूर्ण हवामान अंदाज

Hawamaan Andaaz Today: नमस्कार मित्रांनो, राज्यभरात मान्सूनच्या पावसाने अनेक भागात शुक्रवारी जोरदार बॅटिंग केली आहे. आणि यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

त्याचबरोबर मित्रांनो 30 तारखेला आणि 1 तारखेला राज्यभरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर हवामान अभ्यास करणे दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील विदर्भ, कोकण आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला दोन-तीन दिवस चांगल्या प्रमाणात पाऊस आला. मात्र त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण गायब झाले. आणि यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट देखील येऊ लागले होते. परंतु पुन्हा मधल्या काळामध्ये दोन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसला आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाला पुन्हा पाणी मिळाले.

त्याचबरोबर शुक्रवारी मुंबईमध्ये दिवसभर पाऊस रिमझिम स्वरूपात सुरू होता. आणि याचबरोबर राज्यांमध्ये देखील अनेक जिल्ह्यात वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. आणि यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस देखील बरसला.Hawamaan Andaaz Today

त्याचबरोबर पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असून कमाल तापमानात घट होण्याची शक्यता देखील हवामान तज्ञांनी वर्तवले आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आणि मान्सूनचा पाऊस येण्यासाठी पोषक वातावरण देखील तयार झाले आहे.

त्याचबरोबर शनिवारी रात्रीपासून एक तारखेपर्यंत सातारा, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर खानदेश आणि मराठवाड्यामधील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी नांदेड आणि त्याचबरोबर हिंगोली या जिल्ह्यांना शनिवारी तसेच रविवार या दिवशी येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मोठा त्याला मिळाला आहे.Hawamaan Andaaz Today

Leave a Comment