Hawamaan Andaaz Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून सततधारा पाऊस सुरू झालेला आहे. आणि यामुळे अनेक शेतकरी पाऊस कधी निघून जाईल याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु आता महाराष्ट्रभरात पाऊस दमदार हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतीतील लवकरात लवकर कामे आवरून हवामान अंदाजानुसार शेतीमधील कामे करून घ्यावीत. चला तर मग संपूर्ण हवामान अंदाज खालील प्रमाणे पाहुयात.
हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार, उद्या विदर्भात विजाच्या कडकडाटसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये देखील आज रात्री आणि उद्या दिवसभर पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व ठेवण्यात आले आहे.Hawamaan Andaaz Today
त्याचबरोबर मित्रांनो मध्य महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडाट्यासह पावसाचा जोर वाढून अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागांना वर्तवली आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात वादळ येण्याची शक्यता देखील आहे. त्याचबरोबर कोकण भागातील जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईतील काही भागांमध्ये दमदार पाऊस देखील होऊ शकतो. त्याचबरोबर पुढील दोन दिवस केवळ पाऊस पडणार नाही तर वेगाने वारी देखील वाहणार आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याचा वेग हा 50 ते 60 किमी इतका राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत नक्कीच वाढ होऊ शकते. त्याचबरोबर गरज असेल तरच घराबाहेर शेतकऱ्यांनी पडावे असे देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे…Hawamaan Andaaz Today