CM Ladaki bahin Yojana: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणे अजून झाले सोपे..!! आता फक्त हे 4 कागदपत्रे लागणार

CM Ladaki bahin Yojana: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सध्या सुरू झालेले आहेत. आणि यामुळे महिला कागदपत्र गोळा करण्यासाठी बँकेमध्ये तसेच सरकारी ऑफिसमध्ये फिरत आहेत. आणि त्याचबरोबर ही योजना सुरू झाल्यानंतर विरोधकांनी यावरील चुका सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर सरकारने देखील यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजेच आता या योजनेसाठी केवळ चार कागदपत्र लागणार आहेत. त्याचबरोबर महिला स्वतः तिच्या मोबाईलवरून या योजनेचा अर्ज करू शकणार आहे.

यामध्ये महिला मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे आपला अर्ज करू शकणार आहे. त्याचबरोबर केवळ 4 कागदपत्रे अपलोड (Only Four Documents) करून महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहूयात…

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी अधिवेशनात अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी आहे. त्याचबरोबर ही योजना सुरू झाल्यानंतर लगेचच महिला हा अर्ज करण्यासाठी सज्ज झाल्या असून सरकारी ऑफिसमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसल्यानंतर या योजनेत लगेच बदल करण्यात आले. यामुळे आता महिलांना लवकरात लवकर त्याचबरोबर सोप्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.CM Ladaki bahin Yojana

 चला तर मग कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असतील ते पाहूयात…

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय हे 21 वर्षे ते 65 वर्ष दरम्यान असावे.
  2. त्याचबरोबर लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
  3. त्याचबरोबर अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाखापेक्षा कमी असावे.
  4. अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा.
  5. अर्जदार महिलेच्या घरातील व्यक्ती सरकारी नोकरी किंवा परमनंट खाजगी नोकरीदार नसावा.
  6. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार महिलेच्या घरातील सदस्येच्या नावावर चार चाकी वाहन नसावे…

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला खालील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. यामुळे तुम्ही सविस्तर व्यवस्थित पहा आणि त्यानंतर या योजनेचा अर्ज करा… धन्यवाद….CM Ladaki bahin Yojana

Leave a Comment