T-20 world cup final: नमस्कार मित्रांनो, आज टी-20 विश्वचषकचा शेवटचा सामना म्हणजेच फायनल मॅच आहे. हा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो मागील सामना म्हणजेच भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यांमध्ये पाऊस आला होता. आणि पाऊस आल्यामुळे हा सामना निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ सुरू राहिला. आणि या सामन्यासाठी आयसीसी ने राखीव दिवस ठेवलेला नव्हता. तरीदेखील पावसाच्या विश्रांतीनंतर हा सामना पूर्ण खेळण्यात आला. आणि यामध्ये भारत विजयी झाला.
मात्र मित्रांनो आज पुन्हा सामान्य दरम्यान पाऊस आला तर, कोण जिंकेल त्याचबरोबर आयसीसीचे नियम काय आहेत संपूर्ण माहिती आपण यामध्ये पाहूयात.
मित्रांनो आज टी-20 विश्वचषक फायनल सामना आहे. आणि हा सामना जर पावसामुळे थांबला तर यासाठी आयसीसीने राखीव दिवसाची तरतूद केली आहे. आज रात्री आठ वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यादरम्यान पाऊस आला तर रात्री दहा वाजून 40 मिनिटापर्यंत षटकांची संख्या कमी केली जाणार नाही.
त्यानंतर पाऊस कायम राहिला तर षटकांची संख्या कमी केली जाईल. त्याचबरोबर मित्रांनो आयसीसीच्या नियम 13.7 आणि 13.6 यानुसार पावसाच्या स्थितीत अतिरिक्त 190 मिनिटांचा वेळ निर्धारित करण्यात आला आहे.(तीन तास दहा मिनिटे)T-20 world cup final
भारतीय वेळेनुसार रात्री बारा वाजून दहा मिनिटानंतर जर हा सामना सुरू करण्यात आला तर यासाठी दहा दहा षटकांचा सामना खेळवला जाईल.
त्याचबरोबर काही षटकांनंतर म्हणजेच उदाहरणार्थ 8 षटकांत (ओव्हर) भारत 1 बाद 90 धावा केल्या असतील. आणि या दरम्यान पावसाने हजेरी लावली तर हा सामना रद्द केला जाईल. आणि पुढील दिवशी 20-20 षटके ठरवून सामना खेळवला जाईल.
पुढील दिवशीही पावसामुळे सामना खेळण्यात आला नाही तर आयसीसीच्या नियम 16.10 नुसार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर ओव्हर करण्यात येईल. त्याचबरोबर सुपर ओव्हर देखील शक्य झाली नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल. मात्र टी ट्वेंटी विश्वचषकाच्या 17 वर्षाच्या इतिहासात आतापर्यंत संयुक्त विजेते पद कोणालाही देण्यात आले नाही…T-20 world cup final