Pm Kisan Yojana List: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. त्याचबरोबर ही रक्कम शेतकऱ्यांना तीन समान भागांमध्ये दिली जाते. तसेच या योजनेअंतर्गत 17 वा हप्ता हा जून 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
आता सर्व शेतकऱ्यांना अठरावा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. 18 वा हप्ता मिळवण्यासाठी वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की, लवकरच म्हणजेच ऑगस्ट महिन्यात पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.
त्याचबरोबर या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत? या योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पद्धतीने कशी पहावी? अशी संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहूयात…Pm Kisan Yojana List
या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिला जातो. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे चार चाकी गाडी नाही. जो शेतकरी आयकर भरत नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
त्याच बरोबर या योजनेचा लाभ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटी मार्फत सरकारकडून दिला जात आहे. यामुळे या योजनेत शेतकऱ्यांची कोणतीही पद्धतीची फसवणूक होत नाही.
या योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर सरकारचे अधिकृत पोर्टल ओपन होईल. त्या ठिकाणी विचारलेली साधारण माहिती तुम्ही भरा. ती माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या गावाचे लाभार्थी यादी तुम्हाला पाहायला मिळेल…Pm Kisan Yojana List