Namo Shetkari Yojana list: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका लागणार आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर खुश करण्यासाठी राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
त्याचबरोबर या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहे. त्याचबरोबर नवीन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार का? चौथा हप्ता किती तारखेला येऊ शकतो? त्याचबरोबर शेतकऱ्यांना या योजनेचे किती रुपये मिळतील? याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहूयात…
शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजना आत्ताच सुरू करण्यात आली आहे. आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच मित्रांनो या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करण्यात आले आहे.
आणि त्याचबरोबर लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यात चौथा हप्ता जमा केला जाणार आहे. यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल की नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे. कारण सरकारकडून या योजनेत देखील सातत्याने बदल करण्यात आले आहेत. आणि या बदलामुळे अनेक शेतकरी अपात्र ठरले आहेत. मित्रांनो ही योजना पीएम किसान योजनेवर अवलंबून आहे. म्हणजेच जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात. त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.Namo Shetkari Yojana list
यामुळे जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत. तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहे. त्याचबरोबर राज्य सरकारची ही एक महत्वकांक्षी योजना बनली आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबत किंवा दहा पंधरा दिवसाच्या अंतरावर या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. यानुसार आता राज्यातील नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा 17 जुलै रोजी दिला जाऊ शकतो. अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर तुम्ही या योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी खालील प्रमाणे पाहू शकता…Namo Shetkari Yojana list
नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा