Namo Shetkari Yojana नमस्कार शेतकरी मंडळींना आपल्यासाठी नमो शेतकरी योजनानेबद्दल नवीन माहिती घेऊन आलो आहोत या लेखांमध्ये पाहिली तर नमो शेतकरी योजनेपासून हजारो शेतकरी वंचित आहेत ते कोणत्या कारणामुळे आहेत शेतकऱ्यांचे पैसे का अडकले याचे संपूर्ण माहिती मिळणार आहे.
पी एम किसान योजना याची कॉपी म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्यात आली या योजनेमध्ये बरेच शेतकरी लाभ घेत आहेत व कित्येक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे काहींना या योजनेचा लाभ मिळत आहे पण खात्यामध्ये पैसे येत नाहीत याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
याबाबत पाहिले तर कृषी अधीक्षकअजय कुलकर्णी मनाले शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यांशी तपासणी सुरू आहे त्याबरोबर तहसीलदार कार्यालयाकडून व बँकेकडून त्यांना पाठपुरावा सुरू करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही आणि ज्यांचे झिरो बॅलन्स अकाउंट आहे काही शेतकऱ्यांचे बँक खाते बंद पडलेले आहे या शेतकऱ्यांचे लवकरच बँक खाते सुरू करून आम्ही त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये पाहिले तर चार लाख 93 हजार 24 शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये समावेश आहे आणि यामधील बऱ्याच शेतकऱ्यांचे यूआयडी जुळताना दिसत नाहीत अनेकांची बँक खाते बंद आहेत यामुळेच पहिल्या हप्त्यात 2017 शेतकऱ्यांना यूआयडी न जुळल्यामुळे तसेच बँक खाते बंद असलेले आठ हजार सहाशे सत्तर शेतकऱ्यांचा समावेश आहे.
ही माहिती आपण एका जिल्ह्यामधील पाहत आहोत पण अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची अडचण सुरू आहे यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचण येत आहे.