Havaman Aandaj News: नमस्कार मित्रांनो, सध्या पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात उन्हाच्या झळा लागू लागल्या आहेत. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या माहितीनुसार 15 तारखेनंतर राज्यभरातील अनेक जिल्ह्यात सूर्यदर्शन होऊ लागले आहे. तसेच आत्ताच पंजाबराव यांच्याकडून पुन्हा हवामान अंदाज सांगण्यात आला आहे. या अंदाजाने सांगितले आहे की 18 ऑगस्ट पासून राज्यभरात पुन्हा पाऊस सुरू होऊ शकतो.
सर्व शेतकऱ्यांनी शेतातील कामे लवकरात लवकर करावी. तसेच शेतामध्ये असलेला लवकर शेतकऱ्यांनी काढून घरी आणावा. यामुळे शेतकरी सतर्क झाले असून आता मूग काढण्याच्या तयारीला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. मूग काढण्याची प्रक्रिया शेंगा वाळल्यानंतर शेवटी काढल्या जात असतात. परंतु यावर्षी हवामान अभ्यासाकांनी पाऊस सांगितल्यानंतर सर्व शेतकरी ज्या शेंगा वाळल्या आहेत तेवढ्या तोडून घरी आणूया असा विचार करून मुग काढलेला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच त्रास होईल परंतु शेतकऱ्याचे पावसामुळे नुकसान होणार नाही.
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ऑगस्ट नंतर अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. यामध्ये कोण कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे खालील प्रमाणे जाणून घेऊया.
1) सिंधुदुर्ग 2) कोल्हापूर 3) सांगली 4) अहमदनगर 5) छत्रपती संभाजी नगर 6) सातारा 7) जालना
शेतकरी मित्रांनो, पंजाबराव तसेच भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार वरील जिल्ह्यांमध्ये 18 ते 25 तारखेचा दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील कामे लवकरात लवकर उरकून घ्यावी.Havaman Aandaj News