LPG Gas cylinder: नमस्कार मित्रांनो, सरकार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे. मात्र या योजनेचा लाभ कोणत्या नागरिकांना मिळणार? त्याचबरोबर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल का? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? अशी संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
महाराष्ट्र सरकारने हातच अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. आणि या अर्थसंकल्पात महिलांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्याचा निर्णय स्वराज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर हा अर्थसंकल्प आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषित केला. या अर्थसंकल्पात त्यांनी वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.LPG Gas cylinder
मात्र अनेक नागरिकांना माहीत नाही की या योजनेचा लाभ कोणाला मिळणार… चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे जमा केले जाणार आहेत. त्याचबरोबर ही योजना दारिद्र्यरेषेखालील रेशन कार्डधारकांना आणि केशरी राशन कार्ड धारक कुटुंबांसाठी अमलात आणली आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 56 लाख 16 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेचा शासन निर्णय तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…LPG Gas cylinder