Ladaki Bahin Yojana: नमस्कार, लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात 17 तारखेला शिंदे सरकारकडून जमा केले जाणार आहेत. ही एक महिलांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. परंतु महिलांचे देखील आता दोन ते तीन बँकांमध्ये खाते उघडले असतात. आणि यामुळे आपल्या कोणत्या बँक खात्यात पैसे जमा होणार याबाबत तुम्हालाही प्रश्न पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…
राज्य शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता रक्षाबंधन निमित्त बहिणीला भावाचे गिफ्ट म्हणून शिंदे सरकारकडून दिले जाणार आहेत. म्हणजेच महिलांच्या बँक खात्यात 17 तारखेला तीन हजार रुपये जमा होणार आहेत. हे पैसे ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्हल झाले आहेत त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. यामुळे तुमचा फॉर्म झाल्याचा मेसेज तुम्हाला आला आहे का हे देखील चेक करा. त्याचबरोबर तुम्ही सरकारच्या एप्लीकेशन वर जाऊन देखील या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला की नाही याबद्दलची माहिती पाहू शकता.Ladaki Bahin Yojana
मित्रांनो ज्या महिलांनी पोस्ट ऑफिस बँकेचे पासबुक ऑनलाईन दिले आहे. त्या महिलांचे पैसे त्यांच्या पोस्ट ऑफिसच्या खात्यात येतील. त्याचबरोबर अनेक महिलांनी वेगवेगळ्या बँकेचे पासबुक दिले असतील. यामुळे त्यांना विचार आला असेल की, आपल्या कोणत्या बँक खात्यात पैसे जमा होतील तर मित्रांनो तुम्ही ज्या बँकेची तुमचे आधार लिंक केले आहे. त्याच बँक खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला जर तुम्ही कोणते बँक खाते आधार कार्ड ची लिंक केली आहे याची माहिती नसेल तर तुम्ही याची माहिती खालील पद्धतीचा अवलंब करून पाहू शकता.
आधार कार्ड कोणत्या बँकेची लिंक आहे कसे पहावे?
- सर्वात अगोदर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…
- https://myaadhaar.uidai.gov.in/
- वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर जाताल
- त्यानंतर त्या तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाकून लॉगिन करावे लागेल
- आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी दिलेला कॅप्चा कोड टाकावा
- त्यानंतर लॉगिन विथ ओटीपी या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुमच्यासमोर भरपूर पर्याय दिसतील आणि तुम्ही त्यानंतर त्यामधील बँक सीडींग स्टेटस (Bank Seeding Status) या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला काँग्रॅजुलेशन युवर आधार मॅपिंग ह्याज बीन डन असा मेसेज येईल.
- त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक दिसेल. म्हणजेच आधार क्रमांक चे शेवटचे चार अंक दिसतील आणि ज्या बँकेची तुमचे आधार लिंक आहे त्या बँकेचे नाव दिसेल.Ladaki Bahin Yojana