Atal Bandhkam Kamgar Yojana: अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत नागरिकांना मिळणार घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Atal Bandhkam Kamgar Yojana: नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना सरकारकडून मोठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. सरकारकडून बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी बांधकाम कामगारांना तब्बल 2 लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

तसेच या योजनेसंदर्भात सात फेब्रुवारी 2019 रोजी GR देखील सरकारकडून निर्गमित करण्यात आला होता. त्याचबरोबर हा जीआर (शासन निर्णय) तुम्ही बातमीच्या सर्वात शेवटी लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

या जीआरमध्ये या योजनेची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी कोणते व्यक्ती पात्र असणार आहेत? त्याचबरोबर या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रे लागतात. अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये देखील पाहणार आहोत.

या योजनेचा लाभ केवळ ज्या व्यक्तींनी नोंदणी सक्षम पद्धतीने पूर्ण केली आहे अशाच बांधकाम कामगारांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर ज्यांनी नोंदणी सक्षम केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर बांधकाम कामगार नोंदणी सक्षम करून घ्यावी. तसेच ज्यांची एक्सपायर झाले असेल त्यांनी बांधकाम कामगार यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रिन्यूअल करून घ्यावे.

सरकारचा ही योजना चालवण्याचा नेमका उद्दिष्ट काय आहे

1 या योजनेतून सर्वसामान्य बांधकाम कामगारांना स्वतःचे घर मिळावे

2 त्याचबरोबर गाव खेड्यातील तरुणांना बांधकाम कामगार योजनेतून रोजगार मिळावा.Atal Bandhkam Kamgar Yojana

3 तसेच ही योजना खेडेगावात जास्त प्रमाणात राबवली जात आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते व्यक्ती पात्र असणार?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार नोंदणी केलेली असावी.
  • त्याचबरोबर ही नोंदणी एक्सपायर झालेली नसावी.
  • त्याचबरोबर बांधकाम कामगार अर्जदार व्यक्तीच्या नावावर किंवा त्या व्यक्तीच्या पत्नीच्या नावावर एखादे पक्के घर नसावे.
  • वरील प्रमाणे अटी बांधकाम कामगार व्यक्तीकडे असतील तर, त्या व्यक्तीला लाभ दिला जाईल.

 

 या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात?

  1. सक्षम प्राधि कार्याने दिलेले ओळखपत्र (अनिवार्य आहे)
  2. अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
  3. अर्जदार व्यक्तीकडे जमीन असेल तर सातबारा
  4. अर्जदार व्यक्तीचे बँक पासबुक.
  5. अर्जदार व्यक्तीचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
  6. अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे ईमेल आयडी.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही घरी बसून ऑनलाईन देखील अर्ज करू शकता आणि ऑफलाइन पद्धतीने देखील या योजनेचा अर्ज करू शकता. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकता. त्यानंतर त्यात अर्जाच्या नमुनाची प्रिंट काढून घेऊ शकता. व त्या फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व माहिती भरू शकता भरा. त्यानंतर हा फॉर्म तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मध्ये जमा करू शकता…Atal Bandhkam Kamgar Yojana

 

बांधकाम कामगार फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment