Important update: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की, सरकारने कोणती नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली संसदेचा पहिला पूर्ण अर्थ संकल्प सादर करण्यात आला. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व क्षेत्रातील आणि सर्व स्तरातील लोकांसाठी अनेक घोषणा केल्या. त्याचबरोबर अर्थमंत्री तरुणांना मोठी भेट दिली आहे. ती म्हणजे अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्पीय भाषांमध्ये असे सांगितले की सरकार रोजगार देण्यासाठी तीन प्रोत्साहन योजना राबवणार आणि तीन टप्प्यांनी प्रोत्साहन दिले जाईल.
अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांसाठी निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणातून एक घोषणा केली आहे ती म्हणजे प्रथमच कार्य दलात प्रवेश केल्या वर त्या कामगारांना एक महिन्याचा पगार मिळेल. हा एका महिन्याचा पगार लगेचच देण्यात येईल (DBT), रुपये15000 पर्यंत तीन हप्त्यांमध्ये दिले जाईल.
ज्या नोकरीधारकाचा पगार एक लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. नियुक्ता आणि कर्मचारी या दोघांनाही नोकरीच्या पहिल्या चार वर्षांमध्ये इ पी एफ ओ योगदान अंतर्गत थेट प्रोत्साहन देण्यात येईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की भारतातील ज्या आघाडीच्या कंपन्या आहेत त्यांनी पाच वर्षात एक कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल आणि पाच हजार रुपयांचा मानसिक मानधन सह बारा महिन्याची पंतप्रधान इंटरशिप सुरू केली जाईल.Important update