Budget 2024: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने आत्ताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 202425 या आर्थिक वर्षासाठी महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. आणि या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी देखील मोठमोठ्या घोषणा करण्यात आले आहेत. तसेच हा अर्थसंकल्प भारताला विशेष बनवण्यासाठी असलेला पाया आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चला तर मग जाणून घेऊया या अर्थसंकल्पात भारतातील शेतकऱ्यांना काय काय मिळाले.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आले असून शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प खूपच आनंदाचा आहे. कारण सरकारने कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 25 हजार कोटी रुपये अधिक खर्च करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे कृषी क्षेत्रात नक्कीच सुधारणा होणार आहे.Budget 2024
तसेच अनेक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली होती. ती मागणी म्हणजेच किमान आधारभूत किमती (हमीभाव) म्हणजेच एमएसबीबाबत महत्त्वपूर्ण मागणी केली होती. परंतु या मागणीबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच पी एम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होत होती परंतु या योजनेत देखील रक्कम वाढण्यात आली नाही.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय काय मिळालं? खालील प्रमाणे यादी
- राज्यपरात भागीदारीत कृषी आणि शेतकऱ्यांसाठी डिझेल पायाभूत सुविधांवर काम करणार
- नैसर्गिक शेती वाढवण्यावर सरकारचा विशेष भर राहणार.
- सरकार 32 पिकांसाठी 109 वाण आणणार आहे.
- कृषी तसेच संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटीं रुपये खर्च करण्याची घोषणा.
- 6 कोटी शेतकऱ्यांची माहिती जमिनीच्या नोंदीमध्ये आणली जाणार
- 5 राज्यांमध्ये नवीन किसान क्रेडिट कार्ड जाहीर केले जाणार.
- कृषी, तसेच रोजगार आणि सामाजिक न्यायाला प्रधान्य दिले जाईल.
- सर्वात महत्त्वाची म्हणजे डाळ आणि तेलबियांच्या उत्पन्नात शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त भर हवा यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार. तसेच शेतकऱ्याची उत्पन्न साठवून ठेवण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार.Budget 2024