Yashshree Murder Case: नवी मुंबई या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे अनेक तरुण मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यशश्री शिंदे या वीस वर्षाच्या तरुणीवर अत्यंत क्रूरपणे हल्ला करून हत्या करण्यात आली आहे.
तसेच यशश्री शिंदे या मयंत कुटुंबीयांनी गुरुवारी आमची मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडे दिली होती. मात्र त्यानंतर शुक्रवारी रात्री यशश्री शिंदे हिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोट नाका या ठिकाणी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावर नागरिकांना दिसला. त्यानंतर तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना समोर आली.
या घटनेनंतर यशश्री यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला आहे. आम्हाला न्याय द्या, आणि त्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी पीडितेच्या कुटुंबांनी केली आहे. ही घटना इतकी धक्कादायक आहे की आखा महाराष्ट्र या घटनेनंतर हादरला आहे.Yashshree Murder Case
तसेच आत्ताच दोन महिन्यांपूर्वी अशीच एक घटना पुण्यामध्ये देखील घडली होती. मात्र पुन्हा अशी घटना घडल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यशश्रीच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी, ज्यामुळे इतर कोणत्याही नराधमाच्या मनात असा विचार येणार नाही. तसेच पुन्हा अशी घटना घडणार नाही याची देखील दखल महाराष्ट्र सरकारने तसेच पोलिसांनी घ्यावी. अशी मागणी पीडितेच्या कुटुंबांनी केली आहे.
यशश्रीच्या कुटुंबीयांनी आणखीन एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ती म्हणजे दाऊद शेख हा गेल्या अनेक वर्षांपासून नाहक आमच्या मुलीला त्रास देत होता. यामुळे आम्ही या मुलाच्या विरोधात तक्रार देखील पोलिसात नोंदवली होती. यामुळे या नराधमाला 2019 सालीच पोलिसांनी अटक केले होते. तसेच त्याला तुरुंगवास देखील भोगावा लागला. परंतु, तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा आमच्या मुलीला त्रास येऊ लागला. तसेच त्याने केलेलं हे कृत्य खूप वाईट आहे. त्याला लवकरात लवकर फाशी द्यायला द्यावी अशी मागणी मयंत मुलीच्या कुटुंबांनी केली आहे.
नराधम दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकातील रहिवासी आहे. तसेच तो उरण येथे ड्रायव्हिंगचे काम करत होता. त्याची इथेच यशश्रीशी भेट झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत मुळा दाखल करण्यात आला होता. त्यातच त्याला तुरंगवास मिळाला होता. परंतु पुन्हा त्याने तुरुंगातून बाहेर येतात परवा हा धक्कादायक प्रकार केला. यामुळे अख्खा महाराष्ट्र हदरला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीच्या जवळच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. आणि चौकशी देखील सुरू केली आहे. त्याचबरोबर आरोपीच्या कुटुंबांना देखील तात्काळ ताब्यात घेऊन आरोपीला शोधण्यासाठी चार टीम बंगळरूला रवाना केल्या आहेत. यामुळे आरोपीला लवकरात ताब्यात घेऊन शिक्षा दिली जाईल. असे पोलिसांचे म्हणणे आहे.Yashshree Murder Case