Women Entrepreneurs: नमस्कार मित्रांनो, औद्योगिक विकासासाठी राज्यात तयार करण्यात आलेल्या पोषक वातावरणाचा लाभ महिला उद्योजकांना मिळावा आणि त्यातून महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष धोरण राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय 2017 मध्ये घेण्यात आला होता. आणि आता पुन्हा या योजनेला गती देण्यासाठी सरकारकडून यावर्षी वीस लाखापासून ते कोटी पर्यंत अनुदान देय आहे.
वाशिम जिल्हा ड प्लस वर्गवारीत येत असल्यामुळे येथे 50 लाख अनुदान दिले जात आहे. नवीन उपक्रमांना तालुका वर्गीकरणानुसार ध्येय असलेल्या स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 15 ते 35 टक्के दराने वीस लाख ते एक कोटीपर्यंत भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. उत्पादन सुरू झाल्यानंतर पाच समान वार्षिक हप्त्यांमध्ये त्याचे वितरण करण्यात येते. तसेच वाशिम जिल्ह्यामधील उद्योगांना प्रत्येक युनिट विजय मागे दोन रुपये एक रुपया एवढी सवलत पाच वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाते.Women Entrepreneurs
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा?
वाशिम जिल्ह्यांमध्ये महिला नवीन उद्योग उभारणी करण्यासाठी तब्बल पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आपापल्या जिल्ह्यातील उद्योग केंद्राकडे अर्ज करावे लागणार आहेत. त्यानंतर तुमच्या व्यवसायाची माहिती तसेच तुमची माहिती तपासल्यानंतर तुम्हाला सरकारकडून अनुदानित स्वरूपात तुम्हाला पैसे दिले जातील.
उद्योगासाठी कोणत्या महिलांना मिळणार अनुदान?
म हिला उद्योगांसाठी सरकारकडून 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. परंतु या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळतो हे मात्र तुम्हाला माहीत नसेल. चला तर मग जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर माहिती. या योजनेचा लाभ एकल मालकी, भागीदारी, सहकारी क्षेत्र, खाजगी किंवा सार्वजनिक मर्यादित घटक आणि स्वयंसहाय्यता बचत गट यांना मिळतो या घटकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये कमीत कमी 50 टक्के महिला कामगार असाव्यात अशी शासनाची अट आहे. यामुळे वरील बाबींचा विचार करून तसेच वरील पात्रता असणाऱ्या महिलांनी या योजनेसाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज करणे आवश्यक आहे.Women Entrepreneurs