Vinesh Phogat News: भारताला पॅरिस मधून मोठी धक्कादायक बातमी काल आली आहे. या बातमीमुळे चक्क भारताचं हक्काचं गोल्ड मेडल हातातून निसटून गेले आहे. ही धक्कादायक बातमी भारताला कळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विनेश या महिला कुस्तीपटूचे वजन जर जास्त होते तर तिला सेमी फायनल मध्ये कसे खेळायला मिळाले? जास्त वजन होते तर तिला वजन कमी करता आले नाही का? तिचे वजन नेमकं किती होते? तिने वजन किती कमी केले होते? चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण खालील प्रमाणे पाहूया…
मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार, विनेश फोगाटच हिचे वजन हे मंगळवारी रात्री 52 किलो होतं. हे वजन 50 पेक्षा कमी करण्यासाठी तिने सर्व काही प्रयत्न केले.. यामध्ये तिने केस कापले, नको देखील काढली अगदी शरीरातून रक्त देखील काढण्याची समजून आली आहे. परंतु खरंच शरीरातून रक्त काढल्यानंतर वजन कमी होतं का? रक्त काढल्यानंतर वजन किती कमी होत असेल. तसेच आपल्या शरीरावर काय परिणाम होतो चला तर मग जाणून घेऊया…Vinesh Phogat News
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लड काढल्यामुळे किंवा ब्लड डोनेट केल्यामुळे वजन नक्कीच कमी होऊ शकते. परंतु, हे वजन कमी होण्याचा फरक काही तासांसाठीच राहतो. उदाहरणार्थ तुम्ही जर रक्त काढले आणि लगेच वजन केलं तर एक युनिट रक्त काढल्याचे तीनशे ते चारशे ग्रॅम वजन कमी होऊ शकतो. तसेच तुम्ही जर आता रक्त डोनेट केले आणि उद्या वजन मोजले तर तुमचे वजन कमी होणार नाही.
चला तर मग जाणून घेऊया रक्त काढल्यानंतर किती तासासाठी वजन कमी होऊ शकते?
माहितीनुसार रक्त काढल्याने वजन हे सहा ते बारा तासांसाठी कमी होऊ शकतो. परंतु बारा तासानंतर तुम्ही जर वजन मोजले तर तुमचे वजन पहिल्यासारखंच असेल. तसेच कोणताही व्यक्ती एका वेळेस एक युनिट इतकच रक्त काढू शकतो. तसेच एक युनिटमध्ये 350 मिली ग्रॅम ब्लड असते. म्हणजेच तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रक्त काढला तर तुमचे वजन 350 ग्रॅम पर्यंत कमी होऊ शकते. परंतु हे वजन तुमचे काही तासांसाठीच कमी होऊ शकतो.Vinesh Phogat News