Sim Card Port: फक्त 2 मिनिटात सिम कार्ड BSNL मध्ये पोर्ट करता येणार, लगेच पहा सिम कार्ड पोर्ट करण्याची सोपी पद्धत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sim Card Port: भारतातील सरकारी कंपनी म्हणजेच बीएसएनएल (BSNL) ही होय. त्याचबरोबर दुसऱ्या प्रमुख टेलिकॉम कंपन्या जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल आहेत. परंतु या खाजगी कंपन्यांनी जुलै महिन्यापासून त्यांच्या मोबाईल रिचार्ज प्लॅन मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. या रिचार्ज प्लॅन वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.

यामुळे अनेक जण महागाईला त्रस्त होऊन बीएसएनएल (BSNL) या सरकारी कंपनीकडे वळताना दिसत आहेत. अनेकांनी हा मार्ग शोधला आहे. परंतु, बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी स्पीड देत असल्यामुळे याचा देखील नागरिकांना त्रास होऊ शकतो. परंतु बीएसएनएल च्या किमती खूपच कमी असल्यामुळे हा पर्याय सर्वसामान्य नागरिकांना खूपच परवडणार आहे.

तसेच, टेलिकॉम खाजगी कंपन्यांच्या वाढत्या रिचार्ज मुळे देशभरातील व्यक्ती संतप्त झाले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी सोशल मीडियावर त्यांचा संताप व्यक्त देखील केला आहे. तसेच देशभरात इतर सर्व वस्तूंच्या किमती वाढल्या आहेतच आता त्यातच हा आर्थिक ताण नागरिकांना सोसावा लागणार आहे.

BSNL कंपनीकडे वळले अनेक ग्राहक

जिओ, एअरटेल आणि आयडिया वोडाफोन हे सिम कार्ड वापरत असलेले अनेक नागरिक बीएसएनएल (BSNL) या सरकारी कंपनीकडे वळले आहेत. परंतु अनेकांना बीएसएनएल कार्ड घेण्याची इच्छा आहे. परंतु बीएसएनएल कंपनी नेटवर्क खूपच स्लो देत असल्यामुळे याकडे अनेकांनी पाठ देखील दाखवली आहे. परंतु इतर रिचार्ज प्लॅनच्या तुलनेत बीएसएनएल खूपच स्वस्त असल्यामुळे ग्राहकांसाठी हे वरदान ठरू शकते.

बीएसएनएल वापरकर्त्यांचे फायदे

  • कमी किमतीत चांगल्या सेवा प्रदान करणे.
  • देशभर व्यापक नेटवर्क कव्हरेज मिळणे.
  • सरकारी कंपन्या असल्यामुळे विश्वासार्हता असणे.Sim Card Port

बीएसएनएल कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांचा तोटा

इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत कमी वेगवान इंटरनेट सेवा मिळणे.
काही भागांमध्ये नेटवर्कच्या समस्या उद्भवणे.

बीएसएनएल मध्ये सिम कार्ड पोर्ट कसे करावे?

Bsnl या सरकारी कंपनीमध्ये आपले कार्ड कोर्ट कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहुयात. सुरुवातीला तुम्हाला 1900 या क्रमांकावर “पोर्ट (तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर)” या पद्धतीने एसएमएस पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला एसएमएस द्वारे तुमचा युनिक पोर्टिंग कोड म्हणजेच यूपीसी मिळेल. हा कोड तुम्ही पंधरा दिवसाच्या आत कधीही वापरू शकता.

त्यानंतर तुम्ही बीएसएनएल केंद्रास भेट देऊ शकता आणि त्या ठिकाणी तुमचे कार्ड पोर्ट करू शकता. किंवा तुमच्या गावात येणारे किंवा गावात उपलब्ध असलेल्या दुकानात जाऊन बीएसएनएल कार्डसाठी तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल.

तसेच तुम्ही हे कार्ड पोर्ट केल्यानंतर तुमचे बीएसएनएलचे कार्ड 24 ते 48 तासांमध्ये सुरू होईल. तसेच 48 तासा दरम्यान तुमचे कार्ड सुरू झाले नाही तर तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून पुन्हा सुरू करू शकता. यानंतर तुमचे कार्ड सेवा करण्यास सुरू होईल…Sim Card Port

Leave a Comment