Recharge News Trai नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी आज आम्ही रिचार्ज बद्दल माहिती घेऊन आलो आहोत सध्या बीएसएनएल सोडता सर्वच कंपन्यांचे रिचार्ज भाव वाढलेले आहे यामुळे अनेक लोकांना रिचार्ज करताना आपल्या खिशाकडे पहावे लागत आहे.
तीन जुलैला खाजगी नेटवर्क कंपन्याकडून रिचार्ज प्लॅन मध्ये दरवाढ करण्यात आली यामुळे ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने नाराज दिसत आहेत या संदर्भात नवीन प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. ज्यामुळे रिचार्ज योजना पूर्वीपेक्षाही स्वस्त होऊ शकते हा असा प्रस्ताव खालील प्रमाणे आहे.
Recharge News Trai सध्या पाहिले तर रिचार्ज प्लॅन हे इंटरनेट डेटा त्याबरोबरच अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस या सर्व गोष्टींचा समावेश होत असतो त्यामध्ये पाहिले तर काहींचा इंटरनेट डेटा तर काहींचा एसएमएस पॅक किंवा अमर्यादित कॉलिंग यामधील सर्वच गोष्टींचा वापर होत नाही फक्त जास्त प्रमाणात कॉलिंग चा किंवा इंटरनेट डेटा चा वापर होतो यामुळे अनावश्यक सुविधांसाठीही आपल्याला पैसे मोजावे लागत आहेत यामध्येच तोडगा म्हणून ट्राय नवीन नियम आणू शकतो.
रिचार्ज चे भाव वाढल्यापासून अनेक वेळा ग्राहक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पोर्ट करण्यात व्यस्त झाले आहेत त्यामुळे ट्राय ला सुद्धा यामध्ये काहीतरी नवीन घ्यावा म्हणून ट्रायने एक प्रस्ताव रिचार्ज कंपन्यासमोर ठेवण्यात आलेला आहे, तो प्रस्ताव म्हणजे जर आपल्याला फक्त कॉलिंग आणि एसएमएस लागत असतील तर त्याचा प्लॅन वेगळा कॉलिंगचा प्लॅन वेगळा इंटरनेटचा प्लॅन वेगळा म्हणजे अन आवश्यक खर्च टाळता येईल.
वापरकर्त्यांसाठी कोणता फायदा होणार
जर आपण कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड वापरत असाल तर आपल्याला अनावश्यक सुविधांसाठी सुद्धा पैसे मोजावे लागत आहेत यापुढे हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अनावश्यक पैसे मोजावे लागणार नाही.
त्याबरोबरच ग्राहकांना आपल्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन निवडण्याची मुभा सुद्धा मिळणार आहे म्हणजे ग्राहक सुद्धा खुश होती यामुळे टेलिफोन कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढू शकते ज्यामुळे किमतीत सुद्धा घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर अनेक लोक खुश होतील कारण सर्वांना आत्ताचे रिचार्ज प्लॅन परवडणारे नाही.Recharge News Trai