Power supply 12 hours: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व कृषी पंप धारकांना दिवसा विजपुरवठा व्हावा यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये सरकार विरोधात आंदोलने केली जातात. त्याचबरोबर सरकारकडून लवकरच या तुमच्या आंदोलनावर निर्णय दिला जाईल असे देखील म्हटले जाते. परंतु सरकारलाही दिवसा पुरवठा करणे शक्य होत नाही. परंतु आता अर्जुनी मोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाने) पक्षाच्या काही नेत्यांनी अमरण उपोषण केले होते. आणि या उपोषणानंतर शेतकऱ्यांना 12 तास दिवसा वीज मिळेल अशी शासनाने तसेच महावितरणाने सांगितले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण निर्माण झाले आहे.
त्याचबरोबर मित्रांनो, दुसरीकडे या निर्णयाची अंमलबजावणी कोणी केली, तसेच आम्हीच केली यासाठी श्रीयवादी लढाई देखील त्या ठिकाणी सुरू झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गोंदिया जिल्हा हा जंगल प्राप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. कारण या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या आहे. तसेच या जिल्ह्यातील लोक पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतात. यामुळे पिकाच्या सिंचनाची सोय होणे खूप गरजेचे असते.
तसेच वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाऊन शेतीला पाणी सोडावे लागते. तसेच सिंचनासाठी शेतीशिवारात दिलेल्या शेतकऱ्यांवर काही दिवसांपूर्वी वन्य प्राण्यांनी हल्ला केला होता. त्याचबरोबर या घटना सुरू आहे. यामुळे अशा घटना घडू नये म्हणून सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांचा हिताचा कोणता तरी निर्णय घ्यावा. अशी शेतकऱ्यांची मागणी होती.Power supply 12 hours
यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करावा यासाठी सरकारने आता दिवसा दिवसा वीज पुरवठा करून असा दावा केला आहे. त्याचबरोबर शनिवारपासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देखील केला जात आहे. परंतु उन्हाळा आल्यानंतर पुन्हा महावितरणावर विजेचा भार वाढेल आणि अशावेळी पुन्हा ही सुविधा बंद होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्याचबरोबर सरकारने दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी कुसुम सोलर पंप योजना राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जाऊ शकत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजेच विजेचा भार खूपच वाढतो आणि अशावेळी सर्व गावात एकाच वेळी दिवसा देणे शक्य नसते. यामुळे वेगवेगळ्या गावात वेगवेगळी टाइमिंग असते. आणि त्या टाईम नुसार त्या गावांना वीज पुरवठा केला जातो. परंतु असे न करता आता कुसुम सोलार पंप शेतात लावून शेतकरी उन्हाच्या सहाय्याने दिवसा शेतीला सिंचनाची सोय करू शकतात.
यामुळे कुसुम सोलर पंप हा शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाचा पर्याय बनला आहे. शेतकरी आपल्या शेतामध्ये सरकारच्या अनुदानावर कुसुम सोलर पंप बसवून दिवसा वीज उपलब्ध करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटवर कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करावेत.Power supply 12 hours