Post Office Scheme: नमस्कार मित्रांनो, सर्व शालेय विद्यार्थ्यांना टपाल विभागाकडून शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. आणि त्याचबरोबर या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत. तसेच या योजनेचे अर्ज 9 सप्टेंबर पर्यंत शालेय विद्यार्थ्यांना भरता येणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा अर्ज लवकरात लवकर भरा.
शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा फीस तसेच जाण्या येण्याचा खर्च खूप होतो. यामुळे त्या कुटुंबावर आर्थिक लोड होतो. यामुळे अनेक कुटुंब कर्जबाजारी होतात. अशा घटना घडू नये म्हणून आता पोस्ट ऑफिस कडून शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. आणि या योजनेनुसार प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेचे नाव हे दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना आहे.
तसेच ही योजना भारतातील सर्व राज्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेसाठी सहावी ते नववी पर्यंतचे सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतात. यामध्ये 30 सप्टेंबर रोजी एक परीक्षा आयोजित केली जाईल.Post Office Scheme
पोस्टल विभाग शिष्यवृत्ती योजना पात्रता
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थी मान्यता प्राप्त शाळेत शिक्षण घेत असावा. शिष्यवृत्तीची निवड करताना अर्जदार विद्यार्थ्यांचे अंतिम परीक्षेत किमान 60 गुण असणे आवश्यक आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्याला 60 गुन्हा पेक्षा कमी गुण मिळतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला प्रति महिना पाचशे रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिले जाणार आहेत. म्हणजेच या योजनेत विद्यार्थ्याला वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्याला अंतिम परीक्षा मिळालेल्या मार्कावर पुन्हा अर्ज करावा लागेल. त्यानंतर तो विद्यार्थी पात्र किंवा अपात्र ठरेल.
दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑफलाइन बोर्ड मध्ये अर्ज भरावा लागणार आहे. म्हणजेच यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रोव्हिजन पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागणार आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी अर्जात नमूद केलेली माहिती व्यवस्थित भरावी लागणार आहे. आणि त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे त्याला जोडून. अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर तो अर्ज तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल….Post Office Scheme