Pik Vima GR: 2023 मधील 378 कोटी पिक विमा वाटप, राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 22 कोटी तातडीने जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima GR: नमस्कार मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये 2023-24 च्या खरीप आणि रबी हंगामात एकूण चारशे कोटी निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला होता. आणि त्यानंतर पिक विमा कंपनीकडे हा निधी पोहोचल्यानंतर विमा कंपनीने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 378 कोटी 21 लाख रुपये जमा केले आहेत. परंतु अजून अनेक शेतकरी पिक विमा मिळवण्यापासून वंचित राहिलेले आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी उर्वरित राहिलेली रक्कम 22 कोटी तीन लाख रुपये लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपनीला दिले आहेत.

तसेच 31 ऑगस्ट च्या आत सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा करावा असा निर्देश आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपनीस दिलेला आहे. पिक विमा कंपनीने अंबाजोगाई, परळी तसेच इतर काही तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये कोणतेही कारण न देता काही शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळले आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचे अर्ज कोणतेही कारण न देता किंवा शेतकऱ्यांची तांत्रिक अडचण नसताना अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत त्यांना देखील लवकरात लवकर या योजनेत पात्र करून त्यांच्या खात्यात देखील 31 ऑगस्ट पूर्वी पीक विमा जमा करावा.Pik Vima GR

तसेच या दोन्हीही चा कृषी संचालक यांनी दैनंदिन स्वरूपात आढावा घ्यावा व मंत्री कार्यालयास तात्काळ कळवावे. असा महत्वपूर्ण निर्देश काल झालेल्या बैठकीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना केला आहे. बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी अतिवृष्टी तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे पिकाचे नुकसान होते. त्याचबरोबर अनेक वेळा पावसाचा खंड पडल्याने देखील जिल्ह्यातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे बीड जिल्हाच नव्हे तर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा मिळावा यासाठी देखील धनंजय मुंडे यांचे प्रयत्न सुरू आहेत.

त्याचबरोबर कालची बैठक ही मागच्या पंधरा दिवसात राज्यस्तरावर आयोजित केलेली दुसरी बैठक होती. यामुळे कोणत्याही विमा कंपनीने शेतकऱ्याला पिक विमा योजने पासून अपात्र ठरवू नये. तसेच अपात्र ठरवल्यास तो शेतकरी का अपत्र आहे याबद्दलची स्पष्ट माहिती त्या ठिकाणी सांगावी. तसेच तुम्ही जर कोणतेही कारण न देता शेतकऱ्याचा पिक विमा नाकारल्यास प्रसंगी विमा कंपनीवर आमच्याकडून फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात येतील. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी या दुसऱ्या बैठकीत दिली आहे.

तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही त्यांनी पुन्हा आपला अर्ज ग्रामपंचायत मध्ये जमा करावा आणि त्यानंतर 31 ऑगस्ट पूर्वी तुमच्या खात्यात पिक विमा जमा केला जाईल.Pik Vima GR

Leave a Comment