Ldaka Bhau Yojana: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांकडून अर्ज देखील मागवले आहेत. या योजनेअंतर्गत ज्या तरुणांची बारावी झाली आहे त्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
तसेच या तरुणाचा डिप्लोमा पूर्ण झाला आहे त्यांना आठ हजार रुपये दिले जाणार आहेत. आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये दर महिन्याला देण्यात येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा अर्ज कसा करायचा? त्याचबरोबर या योजनेचा लाभ कोणत्या तरुणांना मिळणार?
या योजनेचा लाभ कोणत्या तरुणांना मिळणार?
जे विद्यार्थी कंपनीत अप्रेन्टिसशिप करतील त्याच विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत ही रक्कम दिली जाणार आहे. जे विद्यार्थी कारखान्यात काम करतील त्यांना शिंदे सरकार पैसे भरणार आहे. या योजनेमुळे बेरोजगारी वर मोठा उपाय झाला आहे.Ldaka Bhau Yojana
अप्रेन्टिसशिप ची रक्कम सुद्धा राज्य सरकार आपल्या तिजोरीतून देणार असल्याची माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी बोलताना दिली. या योजनेअंतर्गत तरुणांच्या खात्यात पैसे तीन गटांमध्ये वर्गीकरण केले जाणार आहेत. तसेच या योजनेचा अर्ज करून महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर करू शकतात.
या योजनेचा अर्ज कोठे करावा?
मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर अर्ज करायचा असेल तर तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता या विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या जवळील सीएससी केंद्रावर देखील जाऊन या योजनेचा अर्ज करू शकता.
या योजनेचा अर्ज करताना नवीन युजरचा पर्याय निवडल्यावर त्यामध्ये नाव, पत्ता आणि वयोगट ही माहिती नक्की भरावी. त्याचबरोबर या योजनेसाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्ष व जास्तीत जास्त वय हे 35 वर्षाच्या आत असावे. या योजनेची पात्रता ही बारावी पास/पदवी/पदव्युत्तर असावे. तसेच ज्या तरुणांचे शिक्षण सुरू आहे. त्या तरुणाला या योजनेत सहभागी होता येणार नाही. या योजनेचा अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी असावा.
उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संखस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. त्याचबरोबर मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी सरकारची अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे आहे…Ldaka Bhau Yojana
येथे क्लिक करून करा या योजनेचा अर्ज