Ladaki Bahin Yojana List: लाडकी बहीण योजनेच्या गावानुसार याद्या जाहीर झालेल्या आहेत यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण ही योजना सुरू झाल्यानंतर लगेच महिला या योजनेचा अर्ज करण्यासाठी धावपळ करू लागल्या होत्या. सुरुवातीला या योजनेत अनेक कागदपत्रे लागत होती. आणि या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी महिला लगेच सरकारी ऑफिसमध्ये दाखल झाल्या.
यामुळे सगळीकडेच गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे सरकारकडून जे आवश्यक कागदपत्रे आहेत तेच कागदपत्रे घेण्याचा निर्णय झाला.(Ladaki Bahin Yojana Benefits List) आणि यामुळे सर्वांची धावपळ कमी झाली. तसेच काहीच दिवसात सरकारने नवीन ॲप्लिकेशन प्रसिद्ध केले. आणि या एप्लीकेशन मुळे महिला घरीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू लागल्या.
परंतु अर्ज भरल्यानंतर त्या ठिकाणी पेंडिंग अर्ज असे दाखवत होते. त्याचबरोबर अनेकांचा अर्ज सबमिट झाल्याचे दाखवत होते. परंतु सक्सेसफर अर्ज झाला असे कोणाचेही दाखवत नव्हते. आता सरकारकडून अर्जाची तपासणी सुरू झालेली आहे. आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांची नावे लाभार्थी यादीत येण्यास सुरुवात झालेली आहेत. हळूहळू ही प्रक्रिया सर्व राज्यांमध्ये पूर्ण होईल. परंतु आता जाहीर झालेल्या या यादीत अनेक गावातील महिलांची नावे समाविष्ट आहेत. आणि या यादीत नाव असलेल्या महिलेच्या खात्यात 100% पैसे जमा होणार असल्याचा दावा देखील सरकारकडून करण्यात आला आहे. खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार लाभार्थी यादीत तुम्ही नाव चेक करू शकता…Ladaki Bahin Yojana List