Kadaba Kutti Machine: कडबा कुट्टी मिशन योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले, लगेच करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kadaba Kutti Machine: शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवतो. ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेमंद आहेत. ग्रामीण भागामध्ये पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. हा व्यवसाय शेतकऱ्यांना करणं सोपा जावो. आणि पशु त्यांचे खाद्य व्यवस्थितपणे त्यांना खाता यावं यासाठी सरकारने ही योजना अमलात आणली आहे. पशुपालन व्यवसाय मध्ये मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. या व्यवसायामध्ये गाई म्हशी शेळी मेंढी इत्यादीचे पालन केले जाते यापासून पासून मिळणारे खत शेतीसाठी खूपच चांगले असते. आणि या खतापासून उत्पादन खूपच चांगल्या प्रकारे वाढते. पिकाची वाढ रासायनिक खतापेक्षाही चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे उत्पन्नही जास्त येतं. म्हणूनच शेतकरी शेती सोबतच दुग्ध व्यवसाय हा जोड व्यवसाय करतात.

दुग्ध व्यवसाय करताना पशूची योग्य काळजी घेतल्यास पशुचे आरोग्य चांगले राहते. त्यांना कोणताही आजार येत नाही. पशुंना योग्यरीत्या खाद्य मिळाले तर त्यांच्यापासूनही उत्पादन आपल्याला चांगले मिळते. म्हणूनच त्यांची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे. जर पशुंना वेळेवर चारा मिळाला नाही तर खूपच नुकसान होऊ शकते. हे नुकसान त्यांच्या दुधावर दिसून येते. पासूनच्या चाऱ्याचे व्यवस्थित नियोजन केले तर आपल्याला नक्कीच फायदा होईल.

सरकारने जनावरांसाठी ही योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत जनावरांना योग्यरित्या चारा देणे सोपा होईल. या योजनेचा ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल, त्यांनी अर्ज कोठे करायचा, कडबा कुट्टी मिशन खरेदी करण्यासाठी किती अनुदान दिले जाणार आहे, याची संपूर्ण माहिती दिलेली आहे.

कडबा कुट्टी मिशन खरेदी करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांपर्यंत अनुदान देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल, त्याचबरोबर लाभार्थ्यांचे नाव 7/12 , शेत जमीन असणे आवश्यक आहे. योजनेसाठी लाभार्थी ठरल्यास SMS द्वारे कळवले जाते किंवा महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरती शेतकरी लॉगिन करून निवड झाली आहे का चेक करू शकता.

मिशन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • 7/12 उतारा,8 अ उतारा
  • मोबाईल नंबर

कडबा कुटी मिशन साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम महाडीबीटी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login पोर्टलवर नोंदणी/रजिस्ट्रेशन करावे लागते.
  • महाडीबीटी पोर्टल वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी अर्जदाराला आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे
  • त्यानंतर आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • अर्ज करा या बटणावर क्लिक करावे, कृषी यांत्रिकीकरण समोरील बाबी निवडा या ऑप्शन वरती क्लिक करा
  • त्यानंतर खाली दाखवल्याप्रमाणे ऑप्शन निवडा
  • प्रमुख घटक-कृषी यंत्र अवजारासाठी खरेदी साठी अर्थसहाय्य
  • तपशील-ट्रॅक्टर/पावर टिलर चलित योजना
  • एचपी श्रेणी निवडा-20 बीएचपी पेक्षा कमी
  • यंत्रसामग्री, अवजारे/उपकरणे-पॅरेज/ग्रेस/रेसेदु
  • मिशनचा प्रकार-कडबा कुट्टी( इंजिन/इलेक्ट्रिक 3 पेक्षा/पावर टिलर)
  • वरील प्रमाणे पर्याय निवडून त्यानंतर अटी समोरील चौकोनात क्लिक करा व जतन करा या बटणावरती क्लिक करा.
  • निवड झाल्यानंतर पूर्व समिती पत्र मिळाल्याशिवाय कडबा कुटी मिशन खरेदी करू नये पूर्व समिती पत्र मिळाल्यानंतरच कुट्टी मिशन यंत्र खरेदी करावे.

 

येथे क्लिक करून करा योजनेचा अर्ज

 

Leave a Comment