E Pik Pahani Online Apply: शेतकऱ्यांनो ई-पिक पाहणी करा, तरच मिळेल पीक विमा..!! अशी करा ऑनलाईन पीक पाहणी
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आज या बातमीत सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत की पिक विमा म्हणजेच नुकसान भरपाई मिळवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? मोबाईल वरून ई-पीक पाहणी कशी करावी? ई-पिक पाहणी करण्याचे फायदे काय? अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत…
शेतकऱ्यांनी शेतामध्ये कोणत्या पिकाची लागवड केली आहे? शेतकऱ्याचे शेत पडीक आहे का? हे पाहण्यासाठी सरकारने मागील पाच ते सहा वर्षांपासून ई-पिक पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. ई-पिक पाहणी केल्यानंतर सरकारला कळते की कोणत्या शेतकऱ्यांनी कोणते उत्पन्न घेतले आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक केली नाही त्याच शेतकऱ्याची शेती पडीक म्हणून घोषित केले जाते. यामुळे ते शेतकरी पिक विमा मिळण्यापासून वंचित राहतात.
आपल्या राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने अशी घोषणा केली आहे की जे शेतकरी ई-पिक पाहणी करतात त्यांनाच पिक विमा दिला जाणार. जे शेतकरी ई-पिक पाहणी करणार नाहीत त्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार नाही. यामुळे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी पिकाची ई-पिक पाहणी करून घेणे आवश्यक आहे. राज्यभरात एक ऑगस्ट 2024 पासून ई-पिक पाहणी करण्यासाठी सुरुवात झाली आहे. तसेच यासाठी शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर 2024 सरकारकडून ठरविण्यात आली आहे. यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शेती पिकातील ई-पिक पाहणी करून घ्यावी.E Pik Pahani Online Apply
शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी काय आवश्यक आहे?
शेतकऱ्यांनो तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये झालेल्या नुकसानीचा पिक विमा म्हणजेच नुकसान भरपाई मिळवायचे असेल तर तुम्ही शासनाने दिलेल्या वेळेच्या अगोदर ई-पिक पाहणी करणे आवश्यक आहे. ई-पिक पाहणी केल्यानंतर आपल्या थेट शेताच्या सातबारा आणि उताऱ्यावर उभे पिकाची वस्तुनिष्ठ अचूकता आणि पारदर्शक नोंद केली जाते. आणि ही नोंद व्हावी म्हणून सर्व शेतकऱ्यांनी यावर्षी 15 सप्टेंबर 2024 च्या अगोदर ई-पिक पाहणी करून घ्यावी.
आपल्या मोबाईलवरून ई-पिक पाहणे कशी करावी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहुयात…
सुरुवातीला ई-पिक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याकडे जावे लागत होते. यामुळे तलाठ्याकडे मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची आणि यामुळे शेतकऱ्यांना यासाठी मोठा वेळ लागायचा. यामुळे सरकारने आता थेट मोबाईल मधून ई-पिक पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शेतकरी आपल्या मोबाईलवरून शेतातील पिकाची ई-पिक करून घेऊ शकतात. तसेच एखाद्या शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसेल? किंवा असलेला मोबाईल चालत नसेल तर तो शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याच्या मोबाईल मधून देखील पिकाची नोंदणी करू शकत आहे. त्याचबरोबर यावर्षी म्हणजेच 2024 खरीप हंगामातील पीकासाठी ई-पिक पाहणी करण्याचे नवीन व्हर्जन 3.0.1 हे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच मित्रांनो तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या पिकाची ई-पिक पाहणी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता…E Pik Pahani Online Apply