CM Ladaka Bhau Yojana: मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेत मोठा बदल..!! आता या तरुणांना देखील मिळणार 10 हजार रुपये, लगेच पहा नवीन शासन निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CM Ladaka Bhau Yojana: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते म्हणाले की, बहिणीसाठी योजना काढली परंतु भावाला काहीही दिले नाही. त्यानंतर आपल्या स्वराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावासाठी देखील नवीन योजना सुरू केली.

या योजनेमुळे बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या तरुणांना महिन्याला आठ हजार रुपये दिले जाणार आहेत. आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा शासन निर्णय…

राज्यभरात लाखो संख्येने तरुण 12वी उत्तीर्ण, तसेच पदवी घेऊन उत्तीर्ण होतात. परंतु हे केल्यानंतर लगेच त्यांना नोकरी मिळत नाही. यासाठी आता सरकारने राज्यातील तरुणांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता शासनाने दिली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे… (Eligibility To Avail The Benefit To The Scheme)

  1. अर्जदार तरुणाचे वय हे 18 ते 35 वर्षा दरम्यान असावे.
  2. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता वरील दिल्याप्रमाणे असावे.
  3. अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  4. अर्जदार तरुणाने आधार नोंदणी केली असावी.CM Ladaka Bhau Yojana

 

या योजनेचा शासन निर्णय येथे क्लिक करून पहा.

 

Leave a Comment