Kukut Palan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये खूपच महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ही माहिती कुकूटपालन व्यवसाय बद्दल आहे. स्वराज्य भरात कुक्कुटपालन हा व्यवसाय अनेक शेतकरी करत करत आहेत. त्याचबरोबर या व्यवसायावरून शेतकरी महिन्याला लाखो रुपये देखील कमवत आहेत. परंतु अजून देखील अनेक शेतकरी असे आहेत की ते कोणताही व्यवसाय न करता केवळ शेतीवर अवलंबून आहेत. परंतु या शेतकऱ्यांची देखील इच्छा असते की आपणही कोणता तरी व्यवसाय करावा. मात्र पैसे अभावी या शेतकऱ्यांना कोणताही व्यवसाय करणे सोपे जात नाही. यामुळे सरकारकडून आधार शेतकऱ्यांना तसेच तरुणांना व्यवसाय करण्यासाठी अनुदान दिले जात आहे.
या अनुदानाचा लाभ घेऊन शेतकरी चांगल्या प्रमाणात आपला व्यवसाय सुरू करू शकतात. तसेच महिन्याला पन्नास हजार रुपयांपर्यंत सहज उत्पन्न कुक्कुटपालन या व्यवसायातून देखील शेतकरी कमवू शकतात. कुकुटपालन हा व्यवसाय पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतो. यामुळे शेतकरी शेती करत करत चांगल्या प्रमाणात पैसे कमवू शकतात.
कुक्कुटपालन योजनेअंतर्गत अनुदान देण्याचे मुख्य उद्देश
महाराष्ट्र राज्य कुकूटपालन करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न कमवत आहे. तसेच अजूनही या व्यवसायाला प्रेरणा मिळावी यामुळे सरकारकडून बेरोजगार तरुणांना तसेच नागरिकांना अनुदान देऊन हा व्यवसाय करण्यास भाग पाडतात. आणि तरुणाने हा व्यवसाय केल्यानंतर एका प्रकारे त्या तरुणाला रोजगारही मिळतो आणि महाराष्ट्रातील कुक्कुट व्यवसायाची संख्या देखील वाढते. तसेच या योजनेमुळे बेरोजगार तरुणांची तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते.Kukut Palan Yojana
कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे?
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रेशन कार्ड
- अर्जदार शेतकऱ्याचा नावावर असलेला सातबारा किंवा आठ अ उतारा
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- चालू मोबाईल नंबर
- आवश्यक असल्यास ईमेल आयडी
कुक्कुटपालन योजनेतून शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान मिळते
कुकूटपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक तान होऊ नये यासाठी सरकारकडून 25% पर्यंत अनुदान दिले जाते. त्याचबरोबर अनुसूचित जाती, प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी व एससी आणि एसटी प्रवर्गातील लोकांना कुक्कुटपालन योजनेअंतर्गत 35 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.Kukut Palan Yojana