Ladaki Bahin Yojana Payment: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारकडून महिलांच्या खात्यात रक्षाबंधनच्या दिवशी मुख्यमंत्री योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील दोन हप्ते महिलांच्या खात्यात एकत्रित जमा केल्या जाणार आहेत. म्हणजेच सर्व महिलांच्या खात्यात रक्षाबंधन दिवशी तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. यामुळे सर्व महिलांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे.
तसेच मोठ्या उत्साहाने सरकारी कर्मचारी देखील महिलांनी केलेल्या अर्जाची छाननी करत आहेत. त्याचबरोबर ज्या महिलांनी अर्जामध्ये चुका केल्या आहेत त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवले जात आहे. त्याचबरोबर ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही त्यांना देखील या योजनेतून अपात्र ठरविण्यात येत आहे. तसेच ज्या महिला या योजनेसाठी पात्र झाले आहे त्यांच्या खात्यात लवकरच म्हणजे दोन दिवसात पैसे जमा होणार आहेत. त्याचबरोबर अनेक महिलांच्या खात्यात आज पासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत.Ladaki Bahin Yojana Payment
यामुळे सर्व महिलांनी आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही याची तपासणी करावी. त्याचबरोबर अर्ज मंजूर झाला नसेल तर तुम्हाला री अर्ज करा म्हणून ऑप्शन आला आहे की नाही? तसेच अर्जातील चुका दुरुस्त करा असा पर्याय आला आहे की नाही हे पाहावे. त्याचबरोबर ज्या महिलांना 17 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधन दिवशी पैसे मिळाले नाही तर उर्वरित महिलांना पुढील हप्ता हा डायरेक्ट चार हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे.
म्हणजेच ज्या महिला आता या योजनेपासून वंचित राहणार आहेत त्यांना पुढील हप्त्यामध्ये तीन हप्ते दिले जातील. तसेच ज्या महिलांना आता या योजनेचा लाभ मिळेल त्यांना पुढील हप्ता हा फक्त 1500 रुपये दिला जाईल. म्हणजेच राज्य सरकारचा असा उद्देश आहे की या योजनेपासून कोणत्याही महिला वंचित राहू नये. यामुळे ही योजना महाराष्ट्रमधील महिलांसाठी खूपच प्रेरणादायी योजना होणार आहे. या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळेल? लाभार्थी यादी तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…Ladaki Bahin Yojana Payment