Ladaki Bahin Yojana List: लाडकी बहीण योजनेच्या गावानुसार याद्या जाहीर झालेल्या आहेत यामुळे महिलांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. तसेच या योजनेच्या लाभार्थी याद्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर सहज पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती…
या योजनेसाठी महिलांनी घरी बसून अर्ज करावा यासाठी सरकारकडून नवीन ॲप प्रकाशित करण्यात आले. तसेच या ॲपवर अनेक महिलांनी अर्ज देखील केले. परंतु अर्ज भरल्यानंतर त्या ठिकाणी पेंडिंग अर्ज असे दाखवत होते. त्याचबरोबर अनेकांचा अर्ज सबमिट झाल्याचे दाखवत होते. परंतु सक्सेसफुल अर्ज झाला असे कोणाचेही दाखवत नव्हते. आता सरकारकडून अर्जाची तपासणी सुरू झालेली आहे. आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांची नावे लाभार्थी यादीत येण्यास सुरुवात झालेली आहेत. हळूहळू ही प्रक्रिया सर्व राज्यांमध्ये पूर्ण होईल.
परंतु आता जाहीर झालेल्या या यादीत अनेक गावातील महिलांची नावे समाविष्ट आहेत. आणि या यादीत नाव असलेल्या महिलेच्या खात्यात 100% पैसे जमा होणार असल्याचा दावा देखील सरकारकडून करण्यात आला आहे. खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार लाभार्थी यादीत तुम्ही नाव चेक करू शकता…Ladaki Bahin Yojana List
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (Adhar Card)
- पॅन कार्ड (Pan Card)
- अर्जदार महिलेचा जन्माचा दाखला
- रेशन कार्ड (Ration Card)
- बँक पासबुक (संयुक्त नसलेले)
- फोन नंबर
- ईमेल आयडी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्व महिलांना वरील कागदपत्रे लागणार आहेत. तसेच अर्ज करताना आता काही नवीन बदल आलेले आहेत. या बदलानुसार अर्ज हा इंग्रजी मधून करावा अशा सूचना देण्यात आले आहेत. तसेच मागील अर्ज इंग्रजीमध्ये नसल्यामुळे काहींचे रिजेक्ट करण्यात आले आहेत. तर अनेक महिलांचे फॉर्म हे सक्सेसफुल देखील झालेले आहेत.
यामुळे सर्व महिला तसेच सीएससी केंद्रावरील कर्मचारी देखील हैराण झाले आहेत. त्याचबरोबर ज्या महिलेचा अर्ज रिजेक्ट करण्यात आला आहे त्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी लवकरच काहीतरी ऑप्शन मिळेल. म्हणजेच जी चूक झाली आहे ती दुरुस्त करता येईल किंवा पुन्हा अर्ज करता येईल. परंतु अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर लगेचच कोणीही पुन्हा अर्ज करू नये.(CM Ladaki Bahin Yojana Augest List Online Download)
सरकारकडून पहिल्यांदी माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी प्ले स्टोअर वर नवीन ॲप बनवण्यात आली होती. परंतु या ॲपवर लाखो महिला तसेच सीएससी केंद्रावरील कर्मचारी झटत असल्यामुळे लोड येऊन हे एप्लीकेशन हँग झाले होते. म्हणजेच अडकत अडकत चालत होते. यामुळे आता पुन्हा सरकारकडून या योजनेचा अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाईट तयार करण्यात आली आहे. यामुळे आता महिला नवीन वेबसाईटवर जाऊन त्यांचा अर्ज व्यवस्थित भरू शकतात. या वेबसाईटवर महिला केवळ पाच मिनिटात त्यांचा अर्ज सबमिट करू शकतात.
सरकारकडून आता गेल्या पंधरा दिवसांपासून अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात अर्जांची संख्या आल्यामुळे तसेच पुढील महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार असल्या कारणामुळे लवकरात लवकर अर्जाची छाननी करावी असे आदेश सरकारने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तसेच लवकरच अर्जाची छाननी करून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या उद्देश सरकारने ठेवला आहे. कारण ज्या वेळेस आचारसंहिता लागेल त्यावेळेस या सरकारकडे कोणताही अधिकार नसेल. यामुळे आचारसंहिता लागणे अगोदर महिलांच्या खात्यात एक हप्ता किंवा दोन हप्त्याचे पैसे जमा करायचा उद्देश सरकारने ठेवलेला आहे.
तसेच अनेक जिल्ह्यातील लाभार्थी झालेल्या महिलांच्या याद्या देखील अधिकृत पोर्टलवर जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या महिलांनी ॲपवर अर्ज केला आहे त्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती सरकारी एप्लीकेशन वर दिसणार आहे. आणि ज्या महिलांनी अधिकृत वेबसाईटवर अर्ज केला आहे. त्यांना अधिकृत वेबसाईटवर अर्जाची स्थिती दिसणार आहे. यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केला आहे त्याच ठिकाणी अर्जाची स्थिती तपासा.Ladaki Bahin Yojana List