Onion Rate Today: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे. सध्या कांदा बाजार भाव आज तब्बल दोनशे रुपयांनी प्रतिक्विंटल मागे वाढ झाली आहे. या वाढीचे मुख्य कारण म्हणजेच दक्षिण भारतात अतिवृष्टी झाल्याने दक्षिणेकडील नवीन कांदा दहा ते पंधरा दिवस उशिराने बाजारपेठेत विक्रीसाठी येणार आहे. आणि या कारणामुळेच कांद्याच्या भावात लासलगाव तसेच विविध बाजार समिती वाढ झाली आहे. त्याचबरोबर बांगलादेशमध्ये देखील कांद्याची निर्यात पूर्ववत सुरू झाल्याने कांद्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे देखील कांद्याच्या भावात परिणाम दिसून आला आहे.
त्याचबरोबर लालसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळा कांद्याच्या भावामध्ये दोनशे रुपयांनी प्रतिक्विंटल मागे वाढ झाली आहे. तसेच चालू कांद्यामध्ये देखील सध्या वाढवण्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यामध्ये उन्हाळी कांद्याचे भाव तीन हजार रुपयांच्या आत मध्ये आले होते. मात्र आता पुन्हा कांद्याने मुसंडी घेतल्यामुळे कांद्याचे भाव तीन हजार रुपये पेक्षा जास्त झाले आहेत.
यामुळे नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण या बातमीमध्ये आता कांद्याचे सर्व जिल्ह्यातील प्रत्येक मिनिटांचे बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण कांद्याचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजार भाव आणि सर्वसाधारण बाजार भाव अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही खालील चार्ट नक्की वाचा. त्याचबरोबर खालील कांदा बाजार भाव चुकीचे तर तुम्ही आम्हाला व्हाट्सअप वर नक्कीच संपर्क साधून अधिक माहिती द्या.Onion Rate Today
बाजार समिती | कमीत कमी बाजारभाव | जास्तीत जास्त बाजारभाव | सर्वसाधारण बाजार भाव |
सातारा | 2000 | 3700 | 3000 |
राहता | 1000 | 3700 | 3200 |
धाराशिव | 2000 | 3400 | 2700 |
भुसावळ | 2300 | 3000 | 2500 |
पुणे | 1800 | 3500 | 2650 |
पुणे- खडकी | 1700 | 2900 | 2300 |
लासलगाव | 2070 | 3650 | 3400 |
पारनेर | 1500 | 3700 | 2800 |
कोल्हापूर | 1950 | 3870 | 2400 |