PM Kisan Yojana Update: 9 कोटी 17 लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर..!! 18 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये यांच्या खात्यात जमा होणार, पती-पत्नी दोघांनाही मिळणार या योजनेचा लाभ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान सन्माननिधी ही योजना मोदी सरकारच्या सर्व योजनांपैकी सर्वात उत्कृष्ट योजना आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत जवळपास नऊ कोटी 17 लाख शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. तसेच मित्रांनो या योजनेत महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तसेच अनेक कुटुंबातील नागरिकांना असे वाटते की आपल्या पत्नीलाही या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. यामुळे अनेकांना असे प्रश्न पडतात की आपल्या पत्नीला या योजनेचा लाभ मिळेल का? त्याचबरोबर आपल्या वडिलांना लाभ मिळत आहे तर आपल्यालाही या योजनेचा लाभ मिळेल का?? चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

 

शेतकरी मित्रांनो देशातील नऊ कोटी 17 लाख शेतकऱ्यांना लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता दिला जाणार आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति वर्ष सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी (DBT) द्वारे डायरेक्ट पाठवले जातात. हे पैसे चार महिन्यांच्या अंतरावर दोन-दोन हजार रुपये अशा समान तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. तसेच मित्रांनो आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 17 हप्ते देण्यात आले आहेत. म्हणजेच एकूणच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेअंतर्गत 34 हजार रुपये जमा केले आहेत. यामुळे सरकारची ही योजना खूपच यशस्वीरित्या पूर्ण होत आहे.

त्याचबरोबर मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांच्या खात्यात अठरावा हप्ता हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केला जाणार आहे. तसेच या योजनेचा हप्ता जमा करण्यासाठी सरकारकडून पैशांची तडजोड देखील सुरू झालेली आहे. यामुळे लवकरच शेतकऱ्यांना या योजनेचा अठरावा हप्ता मिळेल. परंतु सरकारकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.PM Kisan Yojana Update

मात्र सरकारने जाहीर केलेल्या नियमानुसार, पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यामध्ये दिला जातो. आणि तिसरा हप्ता हा डिसेंबर ते मार्च महिन्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. यामुळे निश्चितच सरकारकडून सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 18 व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाऊ शकतात.

पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी कशी पहायची?

पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी असे पहा नाव,…

  • शेतकऱ्यांना सर्वप्रथम पुढे दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
  • https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx
  • त्यानंतर तुम्ही सरकारच्या अधिकृत पोर्टलच्या मुख्यपृष्ठावरील लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर त्या ठिकाणी तुमचे राज्य त्यानंतर तुमचा जिल्हा
  • त्यानंतर उपजिल्हा म्हणजेच तालुका त्यानंतर तुमचे गाव निवडा
  • वरील संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुमच्या गावाची लाभार्थी यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल…PM Kisan Yojana Update

 

Leave a Comment