CM Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही आपल्याला या वेबसाईट वरती नवनवीन योजना माहिती तसेच बाजार भाव व सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती मिळत राहते तसेच आज ज्येष्ठ नागरिकांसाठी माहिती घेऊन आलो आहोत हे सर्व माहिती आपल्याला खाली देण्यात आलेले आहे त्यामुळे आपण हा लेख संपूर्ण वाचावा.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील 65 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्यता आणण्यासाठी आणि त्यांना भेडसावणाऱ्या अपंगत्व आणि दुर्बलतेवर उपाय करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवले जाईल. पात्र लाभार्थींना त्यांच्या बँक खात्यात एकरकमी 3000 रुपये जमा केले जातील. या योजनेसाठी 2024-2025 या वर्षासाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. का आणि कशासाठी? पात्रता आणि निकष काय आहेत? आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? अर्ज कुठे करायचा? A ते Z माहिती जाणून घ्या.
CM Yojana हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने घेतला जात आहे यामुळे आपल्याला हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे अर्ज करण्याचा पत्ता आपल्याला खाली देण्यात आलेला आहे यामुळे आपण अर्ज कुठे करायचा ती माहिती खाली पहा.
का आणि कशासाठी?
– राज्यातील 10 ते 12 टक्के लोकसंख्या 65 वर्षे व त्याहून अधिक वयाची आहे.
– त्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक उपकरणे पुरवली जातील
– गॉगल, ट्रायपॉड, फोल्डिंग वॉकर, कंबरेचा पट्टा, स्टिक व्हीलचेअर, सर्व्हायकल कॉलर, कमोड चेअर, गुडघा ब्रेस, श्रवणयंत्र इत्यादी उपकरणे.
पात्रता आणि निकष
-अर्जदार लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि नागरिक असावा.
– डिसेंबर 2023 पर्यंत त्यांनी वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत
– ६५ वर्षे व त्यावरील नागरिक पात्र असतील
-अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे
– जिल्ह्यातील तीस टक्के लाभार्थी महिला असतील.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
– मतदान कार्ड
– राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक
– पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
– उत्पन्नाचा पुरावा
– स्वत: ची घोषणा
– ओळखपत्रासाठी इतर कागदपत्रे
अर्ज कुठे करायचा?
– सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड, नाशिक – ४२२००१
– महापालिका आणि जिल्हा रुग्णालयातही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.CM Yojana