SBI Bank Update: एसबीआयच्या या एफडी वर मिळणार बंपर व्याज, एसबीआयने आणली नवीन अमृत वृष्टी योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Bank Update: नमस्कार मित्रांनो, एसबीआय बँकेच्या ग्राहकांना खुश करण्यासाठी एसबीआय कडून पुन्हा एकदा नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच या योजनेमध्ये नागरिकांना 7.25 टक्के पर्यंत वार्षिक व्याज मिळणार आहे. आणि या योजनेचे नाव हे अमृत वृष्टी योजना आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती…

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. तसेच या बँकेमध्ये ग्राहकांना नवनवीन योजनेत गुंतवणूक करता देखील येते. यामुळे ही बँक सर्वात विश्वसनीय बँक बनली आहे. तसेच आत्ताच 15 जुलै 2024 रोजी या बँकेकडून अमृत वृष्टी ही योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच या योजनेमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात वार्षिक व्याजदर मिळणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत वृष्टी योजनेत कोणत्या नागरिकांना गुंतवणूक करता येणार?

  • या योजनेत भारतीय नागरिकांना गुंतवणूक करता येणार आहे.
  • तसेच या योजनेत अनिवासी भारतीय ग्राहकांना देखील गुंतवणूक करण्याची संधी देण्यात आली आहे.
  • त्याचबरोबर गुंतवणूकदारांना या विशेष योजना एसबीआय शाखा, योनो ॲप वरून आणि इंटरनेट बँकिंग द्वारे गुंतवणूक करता येणार आहे.SBI Bank Update

या योजनेत गुंतवणूकदारांना किती टक्के व्याजदर मिळणार

एसबीआयच्या या उत्कृष्ट पी एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुणांना 7.25% वार्षिक व्याजदर मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमध्ये झिरो पॉईंट 50 टक्के जास्तीचे व्याजदर दिले जाणार आहे. म्हणजेच ज्येष्ठ गुंतवणूकदारांना या योजनेतून 7.75 टक्के 444 दिवसांसाठी गुंतवणूक केल्यावर व्याजदर मिळणार आहे.

या योजनेत गुंतवणूक करण्याची कालावधी?

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी विशिष्ट (मर्यादित) कालावधी ठेवलेला आहे. एसबीआयच्या या योजनेत नागरिकांना 15 जुलै 2024 पासून 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. तसेच या योजनेत गुंतवणूकदारांना 444 दिवसांसाठी पैसे जमा करावे लागतील. तसेच ही योजना ग्राहकांना जास्तीत जास्त व्याजदर देण्यासाठी एसबीआयने सुरू केलेली महत्त्वपूर्ण योजना आहे.

त्याचबरोबर गुंतवणूकदाराने जर मुदतीपूर्व पैसे काढले तर काय असेल नियम जाणून घेऊया सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

या योजनेत नागरिकांनी जर पाच लाख रुपयांपर्यंत एफ डी गुंतवणूक केली आणि त्याने ही रक्कम मुदतपूर्व काढण्याचा निर्णय घेतला तर त्याला 0.50% शुल्क भरावे लागेल. तसेच एखाद्या नागरिकाने पाच लाख ते तीन कोटी रुपयांच्या दरम्यान एफडी केली तर त्या नागरिकाला एक टक्के शुल्क भरावे लागेल…SBI Bank Update

Leave a Comment