Weather Update 30 July: नमस्कार मित्रांनो, गेल्या 15 दिवसांपासून अनेक जिल्ह्यात सूर्यनारायणाचे दर्शन झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकावर देखील मोठ्या प्रमाणात रोगराई वाढली आहे. तसेच आता सर्व शेतकऱ्यांना ही झाकड उघडण्याची प्रतीक्षा आहे. तसेच अनेक जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि तुरळक प्रमाणात पाऊस पडला असून या जिल्ह्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मात्र काही जिल्ह्यात पावसाने अशी बॅटिंग केली की, त्या जिल्ह्यातील नाली व नदीला एकरूप आले. तसेच त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र आता पावसाचा जोर त्या जिल्ह्यातील देखील कमी झाला आहे. परंतु आज पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.Weather Update 30 July
कोणत्या जिल्ह्यात होणार अति मुसळधार पाऊस…
- मित्रांनो पुण्यातील घाटमाथ्यावर आज देखील अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच पुण्यातील इतर भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
- आज मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल. मात्र मुंबईतील काही भागात आज देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
- तसेच कोकण किनाऱ्यावरील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पाऊस पडण्याचा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
- रायगड या जिल्ह्यात देखील आज अति मुसळधार पाऊस पडू शकतो.
- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. परंतु आज या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडेल अशी अपेक्षा हवामान विभागाने केली आहे.
कोणत्या जिल्ह्याला कोणता देण्यात आला?
- कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच या जिल्ह्यातील घाट परिसरात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे घाट परिसरातील अनेक ठिकाणी बंद केले आहेत.
- अमरावती जिल्ह्यात आज वादळी वारे आणि विजाच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान बाबा कडून या जिल्ह्याला देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
टीप. मित्रांनो सध्या राज्यभरात पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचबरोबर कोणत्याही क्षणी नदीला पूर येण्याची शक्यता असते. यामुळे डोंगर भागातील नद्यांमध्ये होण्यासाठी जाऊ नये. तसेच नदीला पूर आल्यास नदी ओलांडण्याचा साहस करू नये. त्याचबरोबर अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच घरातून बाहेर पडावे. अशा सूचना हवामान विभागाकडून देखील नागरिकांसाठी देण्यात आले आहेत.Weather Update 30 July