yojana doot bharti नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आम्ही नवनवीन माहिती घेऊन येत असतो आज तशीच म्हणजेच अतिशय महत्त्वाची या बातमी द्वारे आपण आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या घरामध्ये तरुण मुलांना नोकरी मिळवून देऊ शकता कोणती नोकरी आहे काय करावे लागणार याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा.
महाराष्ट्रामध्ये विविध योजना राबवण्यात येत असतात याच योजनांचा प्रचार करण्यासाठी आणि योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत या नावाने आपल्याला नोकरी मिळणार आहेत त्यासाठी काय करावे लागणार आहे याबद्दल माहिती पाहूयात.
मुख्यमंत्री योजना दूत चे काम काय आहे
yojana doot bharti सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत असतात पण सर्वच योजनांचा लाभ शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना मिळत नाही कारण काही कडे माहिती अपुरी असते तर काहींना या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा याबद्दल माहिती नसते यामुळे मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी सध्या भरती सुरू करण्यात आलेली आहे यामुळे बेरोजगार तरुणांना सुद्धा नोकरीचा लाभ मिळणार आहे.
50000 योजना दूध निवडण्यासाठी 2024-25 आर्थिक वर्षापासून राबवण्यात कार्यक्रम सात ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे महाराष्ट्र मध्ये विविध प्रकारची माहिती सरकारच्या विविध योजना माहिती जनसंपर्क महासंचालकांच्या आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मंत्री योजना कार्यक्रम राबविण्यात आला आहे राज्यांमध्ये जे कार्यरत यंत्रणे आहेत त्यांची मदत करण्यासाठी सुद्धा या मुख्यमंत्री योजना दूत यासाठी काम करावे लागेल.
कुठे किती जागा असणार
ग्रामीण भागामध्ये पाहिले तर प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक जागा व शहरी भागांमध्ये 5000 लोकसंख्येसाठी एक जागा 50000 हजार योजना दूत राबविण्यात येणार आहेत यामुळे अनेक युवकांना फायदा देखील होणार आहे.
अनेक तरुण मुलांना यामधून रोजगार सुद्धा मिळणार आहे त्यामुळे लाभार्थी आहेत त्यांना दहा हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे हा महिना मानधन स्वरूपात देण्यात येणार आहे आणि त्यासोबतच प्रत्येक निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूत यांचा सहा महिन्याचा करार असणार आहे.
कोण कोण असणार पात्र
जर आपल्याला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपले वय 18 ते 35 असणे आवश्यक आहे अन्यथा आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याबरोबरच आपल्याला कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे आणि संगणक ज्ञान सुद्धा असले पाहिजे त्याला अर्ज करायचा आहे तो अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे उमेदवाराकडे आधार कार्ड व बँक पासबुक स्वतःचे पाहिजे.yojana doot bharti