Yashashree murder case: यशश्री हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट..!! मृत यशश्रीच्या हातावर दोन टॅटू, एकावर आरोपी दाऊदचं नाव…

Yashashree murder case: मित्रांनो आताच काही दिवसांपूर्वी उरण या ठिकाणी तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला होता. तसेच या घटनेची माहिती पोलिसांकडून घेतले जात आहे. त्याचबरोबर या मृत तरुणीच्या केस मध्ये मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळाला आहे. कारण या मुलीच्या शरीरावर दोन टॅटू बनवण्यात आल्याचे बघायला मिळाले आहेत.

त्या दोन टॅटू पैकी एका टॅटू वर आरोपी दाऊद शेख याचे नाव आहे. परंतु, हा टॅटू बळजबरी काढलेला आहे की सौखुशीने काढला आहे. याचा तपास घेण्यासाठी पोलिसांकडून हा टॅटू काढणाऱ्या आर्टिस्टचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे.

पोस्टमार्टम यामध्ये आलेल्या अहवालानुसार या टॅटूचा खुलासा झाला आहे. तसेच एक टॅटू आरोपी दाऊद शेख याच्या नावानेच असल्याची शंका व्यक्त झाली आहे. यामुळे टॅटू काढणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतल्यास पुढील खुलासा होईल. तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये हा टॅटू काढला असल्याची माहिती देखील मिळाली आहे.Yashashree murder case

तसेच टॅटू काढण्यास दाऊदने तरुणीला भाग पाडलं का? किंवा तरुणीने स्वतः हा टॅटू काढला आहे. याचाही तपास यामध्ये केला जाणार आहे. यामागील कारण म्हणजेच टॅटू दाऊद शेख हा देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे पोलिसांना समजले आहे. तसेच आरोपीने हत्या केल्यानंतर तरुणीचा मोबाईल देखील लपवून ठेवला आहे. मोबाईलचा देखील शोध पोलीस घेत आहेत.

आरोपी दाऊद व मृत तरणी एकाच वर्गात शिकलेले आहेत. तसेच हे दोघेही दहावीपर्यंत एकाच शाळेत होते. परंतु त्यानंतर यशश्री पुढे शिक्षण घेत राहिली. परंतु आरोपीने दहावी झाल्यानंतर शिक्षण सोडून दिले. आणि वाहन चालक म्हणून काम करू लागला. त्यानंतर 2019 मध्ये आरोपीने तरुणीची छेड काढली.

या छेडी नंतर यशश्रीने त्याच्यावर विनयभंग आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यामुळे या तरुणाला दीड महिना तुरुंगात राहावे लागले. त्यानंतर तो जामणीवर तुरुंगातून बाहेर आला. मधल्या कोरोना काळात तो बंगळूरूला निघून गेला. त्यानंतर त्या ठिकाणावरून या तरुणीला संपर्क साधण्याचा प्रयत्न तो करत होता.

त्याचबरोबर यादरम्यान तो या तरुणाला भेटण्यासाठी दोन ते तीन वेळा उरण या ठिकाणी आला. असे तपासात पोलिसांसमोर उघड झाले आहे…Yashashree murder case

Leave a Comment