Sukanya Samruddhi Yojana: नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी, मुलींसाठी तसेच राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी सरकार नेहमीच नवनवीन योजना आणत आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेऊन सामान्य नागरिक सक्षम आणि बळकट बनत आहेत. त्याचबरोबर आता अशीच एक मुलींना समृद्ध बनवण्यासाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे मुलीला कमी गुंतवणुकीत जास्त नफा दिला जाणार आहे. यामुळे मुलीचे भविष्य सुरक्षित होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
मुलीचे भविष्य सक्षम बनवण्यासाठी सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत राज्यातील कोणतीही मुलगी खाते उघडू शकते. त्याचबरोबर मुलीच्या खात्यात दरमहा 1000 रुपये जमा करावे लागतील. तसेच तुम्ही ही रक्कम कमी जास्त देखील करू शकता.Sukanya Samruddhi Yojana
सध्या लाखो मुलींची खाते या योजनेसाठी सुरू करण्यात आले आहेत. मुलींची खाते तुम्हाला जर ओढायची असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुमच्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडू शकता. खाते उघडण्या वेळी तुमच्या मुलीचे वय हे 10 वर्षापेक्षा कमी असावे.
सुकवण्यासमृद्धी योजनेत किती टक्के व्याजदर मिळते?
सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या नावावर गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला तब्बल 8.2% व्याजदर दिले जाते. 250 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये चांगला परतावा असल्यामुळे लाखो खाते उघडले जात आहेत.
किती रुपये जमा केल्यावर किती रुपये परतावा मिळतो?
उदाहरणार्थ आपण 1 हजार रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळतो? याबद्दल माहिती पाहूया…. समजा तुम्ही जर मुलीचे वय पाच वर्ष असेल आणि त्यावेळी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडत असाल तर तुम्हाला दरमहा या योजनेत 1000 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही जर या योजने त 15 वर्षे सतत गुंतवणूक केली तर आणि तुमची मुलगी 20 वर्षाची होईपर्यंत मुलीच्या खात्यात तुम्ही 1 लाख 80 हजार रुपये गुंतवणूक कराल.
त्याचबरोबर या गुंतवणुकीवर तुम्हाला सुकन्या योजनेतून तब्बल 8.2% परतावा मिळेल. म्हणजेच तुम्ही तुमच्या मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर या योजनेतून पैसे काढू शकता. मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तब्बल 5 लाख 54 हजार रुपये मिळतील…Sukanya Samruddhi Yojana