SSC HSC Exam Timetable: दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर..!! या वर्षी वेळेअगोदर होणार परीक्षा, लगेच PDF वेळापत्रक पहा

SSC HSC Exam Timetable: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. तसेच या वेळापत्रकानुसार यावर्षी दहावी बारावीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान होणार आहेत. तसेच राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण यांना विभागीय मंडळ मार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ही दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये घेण्यात येत असते. परंतु, यावेळेस 2025 ची फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात येणारी बारावीची परीक्षा ही आठ दिवस अगोदर घेण्यात येणार आहे.SSC HSC Exam Timetable

तसेच दहावीची परीक्षा ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातात. परंतु या परीक्षा देखील यावर्षी दहा दिवस अगोदर घेण्यात येणार आहेत. तसेच या परीक्षेचा निकाल अनुक्रमे मेअभरीत आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडून अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणी सुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै ऑगस्ट ची पूर्व आणि परीक्षा साधारणतः जुलै च्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाते.

यावर्षीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा वेळापत्रक खालील प्रमाणे

  • उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम- मंगळवार, दिनांक 11 फेब्रुवारी,  2025 ते मंगळवार, दिनांक 18 मार्च 2025
  • माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता दहावीच्या परीक्षा) परीक्षा- दिनांक 21 फेब्रुवारी 2025 शुक्रवार, ते सोमवार दिनांक 17 मार्च 2025 यादरम्यान होतील.

SSC HSC Exam Timetable

Leave a Comment