PM Matru Vandana Yojana: प्रधानमंत्री मातृत्व वंदना 2.0 योजनेअंतर्गत महिलेला मिळणार 11000 रुपये, लगेच या ठिकाणी करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Matru Vandana Yojana: नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2.0 अंतर्गत महिलांना अकरा हजार रुपये अनुदान सरकारकडून दिले जाणार आहे. यासाठी महिलांकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. त्याचबरोबर या योजनेचा मागील काही काळात लाखो महिला लाभ देखील घेत आहेत. तसेच आता पुन्हा पंतप्रधान मोदींनी 2.0 या नावाने महिलांसाठी याच योजनेत काही बदल केले आहेत.

यामुळे हे बदल सर्वसामान्य महिलांनी लक्षात घेणे खूपच महत्त्वाचे आहे. सरकारने आता या योजनेचा अर्ज करण्याची पद्धत बदलली आहे. म्हणजेच सुरुवातीला या योजनेचा अर्ज महिलांना अंगणवाडीमध्ये ऑफलाइन पद्धतीने भरता येत होता. आता असा देखील अर्ज महिलांना भरता येणार असून ऑनलाईन देखील अर्ज महिला या योजनेसाठी करू शकतात.

यामुळे राज्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळेल. असा महत्त्वपूर्ण सरकारचा हेतू आहे. हा अर्ज महिलांना महिला व बालविकास विभाग यांच्या अधिकृत वेबसाईटवर करता येईल. यांची अधिकृत वेबसाईट आम्ही बातमीच्या सर्वात शेवटी दिलेले आहे.PM Matru Vandana Yojana

अनेक महिला दररोज काम करून घराची आर्थिक स्थिती सुधारत असतात. परंतु प्रसूती दरम्यान महिलांना काम करता येत नाही. यामुळे त्यांना अधिक तान सहन करावा लागतो. यामुळे या कालावधीत होणारे नुकसान भरपाई म्हणून सरकारकडून काही प्रमाणात आर्थिक मदत दिली जात आहे.

त्याचबरोबर महिला पौष्टिक आहार खाऊन या कालावधीत आराम करावा यासाठी गर्भवती महिलांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम पाठवली जाणार आहे. तसेच गर्भवती महिला सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत प्रसूती करू शकते. यामुळे या महिलांना दवाखान्याचा खर्च देखील येणार नाही.

तसेच या योजनेचा लाभ सर्व 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्नापेक्षा उत्पन्न असलेल्या महिलांना दिला जाणार आहे. तसेच ज्या महिला सार्वजनिक क्षेत्रात किंवा सरकारी क्षेत्रात काम करत आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. या योजनेची अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे आहे...PM Matru Vandana Yojana

 

 

महिला युवक बालविकास विभाग अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment