Onion Rate Today: नमस्कार मित्रांनो, संध्या कांदा उत्पादक शेतकरी पावसामुळे त्रस्त झाले आहेत. कारण गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर अनेक भागात सतत पाऊस सुरू आहे. आणि यामुळे कांदा विक्रीसाठी बाजारामध्ये शेतकऱ्यांना घेऊन येता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल आहेत.
परंतु, यामुळे गेल्या अनेक दिवसात कांद्याची आवक बाजारात कमी येत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज कांद्याच्या भावात 100 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. परंतु सर्वच शेतकरी आता पाऊस उघडण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
कारण अनेक जागेवर कापूस पिकाची तसेच सोयाबीन पिकाची खुरपणी करणे राहिलेले आहे. आणि या कारणामुळे कापूस पिकापेक्षा जास्त शेतामध्ये गवत उगलेले आहे. त्याचबरोबर हवामान विभागानुसार पुढील सात दिवस असेच ढगाळ वातावरण राहणार आहे.
चला तर मग मित्रांनो आपण आजचे कांदा बाजार भाव पाहुयात…Onion Rate Today
बाजार समिती | कमीत कमी भाव | जास्तीत जास्त भाव |
कोल्हापूर | 2750 | 3300 |
अकोला | 2300 | 3000 |
छत्रपती संभाजी नगर | 1300 | 2900 |
चंद्रपूर | 3000 | 4000 |
मुंबई | 2700 | 2900 |
खेड | 2000 | 4000 |
सातारा | 2800 | 3700 |
राहता | 2000 | 3000 |
जुन्नर | 1700 | 3100 |