Ladaki bahin Yojana online Form: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री सरकारकडून लाडकी बहीण या योजनेमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला महिलांना अनेक कागदपत्र गोळा करण्याची आवश्यकता होती. मात्र आता सरकारने या बदललेल्या नियमांमुळे केवळ 4 कागदपत्रांद्वारे ऑनलाईन पद्धतीने महिलांना अर्ज करता येणार आहे.
शहरातील तसेच खेडेगावातील महिला आणि तरुण मुली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईल वरून अगदी सोप्या पद्धतीने एका मिनिटात अर्ज करू शकणार आहेत. या अर्जाची संपूर्ण माहिती आम्ही या बातमी दिलेली आहे. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत खालील प्रमाणे…
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण (Ladaki bahin Yojana online Form) योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम, तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वर जा.
- त्यानंतर त्या ठिकाणी नारी शक्ती दूत हे ॲप सर्च करा आणि इन्स्टॉल करा.
- आता हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर, ओटीपी आणि नियम आणि अटींवर त्या ठिकाणी क्लिक करावे लागेल. आणि सर्वात शेवटी लॉगिन ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
- त्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाइल अपडेट करावी लागेल.. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, ई-मेल तुमचा जिल्हा, आणि नारीशक्ती प्रकार टाकायचा आहे. त्यानंतर अपडेट करा
- नंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचे आहे
- अपडेट झालेला ऑनलाईन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी विचारलेले संपूर्ण माहिती त्या ठिकाणी टाकून. माहिती सबमिट करा शेवटी असा पर्याय दाबा.
- . त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची माहिती एकत्रितपणे दाखवली जाईल. ती माहिती बरोबर आहे की नाही हे चेक करा. आणि त्यानंतर भरलेली माहिती कन्फर्म करा.
- आणि त्यानंतर सबमिट हे बटन दाबा…
या योजनेसाठी कोणाला अर्ज करता येणार
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांच्या घराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- त्याचबरोबर अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर भरत नसावा
- त्याचबरोबर अर्जदार कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी पदावर नसावा
- अर्जदार महिलेला इतर सरकारी कोणत्याही योजनेमार्फत 1500 रुपयांपेक्षा जास्त महिन्याला लाभ मिळत नसावा.
- त्याचबरोबर अशा इत्यादी अटी महिला पूर्ण करत असेल तर त्या महिला या योजनेचा लाभ दिला जाईल..Ladaki bahin Yojana online Form