Ladaki bahin Yojana: संपूर्ण राज्यभरातून महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्याचबरोबर या योजनेचे अर्ज महिला केवळ सबमिट करून आल्या आहेत. कारण लगेच या योजनेअंतर्गत महिला पात्र आहे की अपात्र हे दाखवले जात नाही. आता राज्य सरकारकडून कोणती महिला पात्र आहे तसेच कोणत्या महिला अपात्र आहेत याबद्दल प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या योजनेसाठी केवळ 21 ते 65 वयोगटातील महिलाच अर्ज करू शकत होत्या. परंतु ज्या महिलेचे वय 19 वर्षे आहे. आणि अशा महिलांनी जर या योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्यांना या योजनेत अपात्र ठरवले जाईल. त्याचबरोबर ज्या महिलेचे 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या महिलांना देखील या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे. आणि ज्या महिला सर्व पात्रता पूर्ण करून लाभार्थी ठरतील त्यांना सरकारकडून एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच वर्षाला 18000 रुपये दिले जाणार आहेत.Ladaki bahin Yojana
तसेच ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला आहे त्यांच्या याद्या देखील ऑनलाईन सरकारकडून अपलोड करण्यात आले आहेत. आणि तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव देखील पाहू शकता.
त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची छाटणी आता सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या महिला पात्र आहेत त्यांना Approved मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर महिला त्यांच्या अर्जाचे स्टेटस ऑनलाइन देखील पाहू शकतात.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही जर तुमच्या मोबाईलवरून केला असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या मोबाईलवर पाहता येईल. परंतु तुम्ही जर अंगणवाडी किंवा आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज केला असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पाहता येणार नाही. तसेच तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती कशी पहावी याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Ladaki bahin Yojana