Jamin Aadhar Card: नमस्कार मित्रांनो, आपल्या जमिनीच्या अधिकृत नोंदी सोप्या पद्धतीने म्हणजेच सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने डिजिटल इंडिया लँड रेकॉर्डस आधुनिकीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम सुरू केला होता. आणि या कार्यक्रमात असे घोषित करण्यात आले आहे की आता सर्व जमीनधारकांना भू आधार कार्ड लागणार आहे. तसेच या आधार कार्ड मुळे शेतकऱ्यांना आणि सरकारला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या व आधार कार्ड बद्दल सविस्तर माहिती.
भू आधार कार्ड म्हणजे काय?
भू आधार कार्ड म्हणजे सरकारने आत्ताच जाहीर केलेले शेतजमिनीसाठी जाहीर केलेले महत्त्वपूर्ण कार्ड आहे. या कार्डच्या मदतीने शेत जमिनीच्या आधुनिक ओळखीसाठी चौदा अंकी क्रमांका देण्यात येणार आहे. तसेच या 14 अंकी नंबरला अल्फान्यूमॅटिक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देखील म्हटले जात आहे. तसेच हे 14 अंक जमिनीला वेगळीच ओळख निर्माण करण्यास मदत करत आहेत.Jamin Aadhar Card
महत्त्वाचे म्हणजे जमीन मालकाचे आधार कार्ड आणि भू आधार कार्ड एकमेकांशी जोडलेले असणार आहे. यामुळे अधिकृत बाबी आणि सरकारी योजना सहजपणे पार पाडता येणार आहेत.
भाऊ आधार कार्ड मुळे शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार?
शेत जमिनीच्या नकाशाचे अचूक स्थान आणि चतुर्थांश जमीन मालकाची माहिती. तसेच नैसर्गिक संसाधने, खनिजे आणि पाण्याची पातळी अशी संपूर्ण माहिती या आधार कार्डवर शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. तसेच पीक निवड करण्यासाठी रासायनिक माहिती, जमिनीचा प्रकार आणि जमिनीवर किती कर्ज आहे याबद्दल सविस्तर माहिती या भू आधार कार्डवर मिळणार आहे. तसेच या जमिनीवर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे याबाबत माहिती. आणि दर चार वर्षांनी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन बसवण्यासाठी 85 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
भू आधार कार्ड बनवण्यासाठी काय प्रोसेस आहे?
भाऊ आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जावे लागेल. किंवा तुम्ही पंचायत समितीची संपर्क साधू शकता. त्यानंतर तुम्हाला यासाठी अर्ज करावा लागेल. आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला जमिनीशी संलग्न असलेले संपूर्ण कागदपत्रे आणि जमीन मालकाची वैयक्तिक कागदपत्रे लागणार आहेत. तुम्ही हे सर्व कागदपत्रे घेऊन ग्रामपंचायत मध्ये किंवा सीएससी सेंटरवर या योजनेसाठी अर्ज करू शकता.
अर्ज केल्यानंतर तुमच्याकडे तुमच्या जमिनीची पडताळणी करण्यासाठी पंचायतीकडून प्रत्यक्ष अधिकारी येतील. तसेच तुमची माहिती सर्व बरोबर असेल तर तुम्हाला भू आधार कार्ड दिले जाईल.Jamin Aadhar Card