Gas Cylinders e-kyc: नमस्कार मित्रांनो, शिंदे सरकारने आत्ताच महिलांसाठी अनेक लाभदायी योजना सुरू केल्या आहेत. आणि या योजनेचा लाभ घेऊन महिला नक्कीच आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतात. तसेच शिंदे सरकारने सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. तसेच या अगोदर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गोरगरीब कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. तसेच आता या निर्णयानुसार राज्यातील कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र तील सरकारने या योजनेचे नाव हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ठेवले आहे. तसेच या योजनेचा मुख्य उद्देश हा महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे आणि राज्यात जास्तीत जास्त गॅस कनेक्शन कुटुंबांनी वापरावे आणि कुटुंबातील सर्वच नागरिकांचे आरोग्य सुधारणे हा आहे.
चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र भरातील गोरगरीब कुटुंबातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमुळे महिला स्वच्छ इंधन वापरण्यास सुरुवात करत आहेत. त्याचबरोबर या योजनेमुळे महिलांना तीन गॅस सिलेंडर वार्षिक मोफत दिल्यामुळे मोठा आर्थिक दिलासा देखील मिळत आहे. या योजनेमुळे अनेक महिला घरामध्ये गॅस कनेक्शन आणून घरातील चूल बंद करत आहेत. यामुळे घर धूर होत नाही. यामुळे महिलांचे आरोग्य देखील सुधरत आहे.Gas Cylinders e-kyc
त्याचबरोबर या गॅस सिलेंडर मुळे पर्यावरण संरक्षण देखील होत आहे. म्हणजेच वृक्षतोड कमी होणार आहे. तसेच घरातून धूर निघत नसल्यामुळे वातावरणात स्वच्छता देखील पसरणार आहे. यामुळे पक्षी तसेच आपले देखील जीवन आनंदमय होणार आहे.
या योजनेची ई-केवायसी प्रक्रिया खालील प्रमाणे पाहुयात
या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी अशी घोषणा केली आहे. म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी e-KYC करणे अनिवार्य आहे.
यामुळे अर्जदार म्हणजेच लाभार्थी महिला त्यांच्याजवळ असलेल्या गॅस एजन्सीकडे जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकते. या योजनेची केवायसी पूर्ण करण्यासाठी महिलेला फक्त आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते हे आधार लिंक असणे खूप गरजेचे आहे. जर तुमचे बँक खाते आदर्श लिंक नसेल तर तुम्हाला सुरुवातीला तुमचे बँक खाते आदर्श लिंक करून घ्यावे लागेल.
तसेच तुमचे आधार कार्ड लिंक असेल तर तुम्ही गॅस एजन्सीकडे जाऊन केवळ पाच मिनिटात तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता. आणि या योजनेचा लाभ तुम्हाला त्यानंतर नक्कीच मिळेल.Gas Cylinders e-kyc