E-shram Card List: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की कोणत्या ई-श्रम कार्डधारक नागरिकांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. त्याचबरोबर मिळालेला एक हजार रुपयांचा हप्ता कोणत्या नागरिकांना मिळालेला नाही. तसेच या योजनेअंतर्गत तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत? अशी संपूर्ण माहिती या बातमीमध्ये पाहणार आहोत. यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमी पाहायला मिळतील.
ई-श्रम कार्ड योजनेअंतर्गत कोणत्या नागरिकांना मिळतो लाभ E-shram Card List
ई-श्रम कार्ड मार्फत जे गोरगरीब मजूर आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. म्हणजेच मित्रांनो जे बांधकाम कामगार आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना या योजनेत सामील केले जाते. आणि त्यानंतर या योजनेअंतर्गत कामगारांना एक हजार रुपये हप्त्याला जमा केले जातात. तसेच या योजनेत आतापर्यंत 38 कोटी कामगारांचा समावेश केलेला आहे.
ई-श्रम कार्ड योजनेचे पैसे जमा झाले की नाही कसे पाहायचे? स्टेप बाय स्टेप माहिती
- सर्वात सुरुवातीला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
- https://eshram.gov.in/
- त्यानंतर त्या ठिकाणी आधार ई-आधारकार्ड द्वारे लाभार्थी स्टेटस चेक करता येते
- त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर जोडलेला आहे त्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल.
- तो ओटीपी त्या ठिकाणी टाकून तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे चेक करू शकता.E-shram Card List