Annapurna Scheme 2024: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये नागरिकांसाठी गॅस सिलेंडर मोफत मिळणार या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत ही योजना कोणत्या नागरिकांना लागू होणार आहे त्याचबरोबर योजनेची कोण कोण लाभ घेऊ शकतात या योजनेचा अर्ज कसा करायचा, योजनेचे उद्दिष्ट काय आहे योजनेसाठी लाभार्थ्यांची संख्या किती पटीने आहे त्याचबरोबर पात्रता काय असेल योजनेची अंमलबजावणी कोण करणार आहे. याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्र सरकारने गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार ही योजना राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे लाखो नागरिकांना मदत मिळणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक रक्षण विभागाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 30 जुलै 2024 रोजी जाहीर केली आहे. या योजनेद्वारे नागरिकांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे.
अन्नपूर्णा योजनेचे उद्दिष्ट
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गरीब कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य त्याचबरोबर नागरिकांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे. गॅस कनेक्शन महिलांचे नाव वर असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे गॅस सिलेंडर 14.2 किलोग्रॅम वजनाचे आहे.
प्रधानमंत्री अन्नपूर्ण योजनेचे लाभार्थी
या योजनेचे लाभार्थी हे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी असणार आहेत. पात्र लाभार्थ्यांचे कुटुंब आणि सुमारे 55.16 लाख लाभार्थी योजनेसाठी पात्र आहेत.
लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना
गॅस सिलेंडर वितरण तेल कंपनीमार्फत केले जाणार आहे. एका कुटुंबांमधील एक राशन कार्ड वरील एकच व्यक्ती योजनेसाठी पात्र ठरेल. सरासरी संपूर्ण बाजारात बाजार भाव हा 830 रुपये आहे. केंद्र सरकार एक सिलेंडर 300 रुपये सबसिडी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणार. राज्य सरकार उर्वरित रक्कम 530 रुपये बँक खात्यात जमा करणार आहे. एका महिन्यात एका सिलेंडर साठी सबसिडी दिली जाईल.Annapurna Scheme