Mukhyamantri ladki bahin: आज आपण या बातमीमध्ये महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील? या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील? त्याचबरोबर या योजनेचा शासन निर्णय काय आहे? अशी संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा…
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये (Mukhyamantri ladki bahin yojana) राज्य सरकारकडून नवीन मोठे बदल करण्यात आले आहेत. या योजनेत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या सर्व महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. म्हणजेच या वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये राज्य सरकारकडून दिल्या जाणार आहेत.
त्याचबरोबर सरकारने या योजनेतील त्रुटी दूर करून नवीन बदल केलेले आहेत. त्याचबरोबर सुरुवातीला या योजनेत किती महिला लाभ घेऊ शकतात असा उल्लेख केला नव्हता. परंतु आता स्पष्टपणे या योजनेत एका कुटुंबातील केवळ दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.Mukhyamantri ladki bahin
आणि एखाद्या महिलेचा जन्म हा परराज्यात झालेला असेल आणि तिचे लग्न महाराष्ट्र राज्यातील पुरुषाशी झाले असेल तर तिला देखील या योजनेचा लाभ दिला जाईल. परंतु तिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पतीचे पंधरा वर्षांपूर्वीच्या अधिवासाचे पुरावे सिद्ध करण्यासाठी जुने कागदपत्र अर्ज करताना जमा करावे लागतील. असं केल्यानंतर त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल.
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- हमीपत्र
या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलेला केवळ चार कागदपत्रे लागणार आहेत. त्याचबरोबर या योजनेचा अर्ज महिला प्लेस्टोर वरील नारीशक्ती दूत या ॲप वर ऑनलाइन पद्धतीने करू शकते. त्याचबरोबर या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता…Mukhyamantri ladki bahin