Free Elelctricity Yojana: मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय..!! ऑगस्ट पासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज, लगेच पहा शासन निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Elelctricity Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामधील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज ही एक महत्त्वाची योजना ठरणार आहे. कारण या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 47.41 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे शासन निर्णय.

शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 पर्यंत 47.41 लाख शेतकरी कृषी पंप ग्राहक आहेत. म्हणजेच एवढ्या ग्राहकांना महावितरण कंपनी वीज पुरवठा करत होती. त्याचबरोबर या एकूण ग्राहकांपैकी 16 टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरांपैकी सुमारे 30 टक्के उर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी केला जातो. असेही या शासन निर्णयात म्हटले गेले आहे.Free Elelctricity Yojana

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशन दरम्यान अर्थसंकल्पीय भाषण करताना मुद्दा क्रमांक 100 वा म्हणून शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार असा निर्णय घेण्यात आला. चला तर मग काय म्हणाले मुख्यमंत्री पाहूया…,

भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून असते. याची आपल्याला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. आणि याच कारणामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान भोगावे लागत आहे. अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार आता मदत करणार आहे.

यामुळे आपले सरकार मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना सुरू करत आहे. आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार शासन उचलण्याचे ठरवले जात आहे. म्हणजेच राज्यातील सर्व 7.5 अश्वशक्ती (एचपी) क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवले जाणार आहे. याकरिता राज्य सरकार 14760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देत आहे.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा शासन निर्णय खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Free Elelctricity Yojana

येथे क्लिक करून पहा या योजनेचा शासन निर्णय

 

Leave a Comment